'बाहुबली'च्या डाएटमधील मोठी अडचण
एबीपी माझा वेब टीम | 03 May 2016 08:06 AM (IST)
मुंबई: 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभास ‘बाहुबली 2’ या सिक्वलसाठी प्रचंड मेहनत घेत आहे. त्यासाठी प्रभास त्याच्या डाएट चार्टचं तंतोतंत पालन करत आहे. पण प्रभास एका मोठ्या अडचणीत सापडला आहे. कारण, डाएटमध्ये त्याला जंक फूड, फास्ट फूड, गोड पदार्थ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आईस्क्रिम खाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. पण आईस्क्रिमला मनाई म्हणजे प्रभाससाठी अशक्य गोष्ट आहे. प्रभासचा आईस्क्रिम हा सर्वात आवडता पदार्थ असून फ्रूट इक्झॉटिका हा त्याचा आवडता फ्लेवर आहे. आवडीचा पदार्थ म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. मात्र प्रभास दिग्दर्शक राजमौली यांची परवानगी घेऊन, आईस्क्रिमवर ताव मारतो. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बाहुबली’ या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई करत प्रेक्षकांना वेड लावलं होतं. या सिनेमाच्या यशासोबतच 'बाहुबली'चा दुसरा भाग म्हणजेच ‘बाहुबलीः द कन्क्लुजन’ हा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर 14 एप्रिल 2017 रोजी मिळणार आहे.