मुंबई : बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक मिलन लुथरिया यांचा अपकमिंग सिनेमा 'बादशाहो'चा टीझर रिलीज झाला आहे. देशातील आणीबाणीवर आधारित असलेल्या या सिनेमात अभिनेता अजय देवगन, इम्रान हाश्मी मुख्य भूमिकेत आहेत.


या सिनेमात अजय देवगन आणि इम्रान हाश्मी यांच्याशिवाय इलियाना डिक्रूज, ईशा गुप्ता आणि विद्युत जामवालही दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं. ज्यामध्ये सिनेमातील सर्व कलाकार दाखवण्यात आले होते.

''1975 आणीबाणी, 96 तास, 600 किलोमीटर'', असं या सिनेमाच्या पोस्टरमध्ये म्हटलेलं आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा 1 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

पाहा टीझर :