Ayushmann Khurrana : आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आहे. त्याच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होत असतं. आयुष्मानने आपल्या करिअरमध्ये अनेक चांगल्या भूमिका निभावल्या आहेत. चाहते त्याच्या अभिनयासह फॅनश सेन्सचंदेखील कौतुक करत असतात. बॉलिवूडच्या स्टायलिश अभिनेत्यांमध्ये त्याचा समावेश होतो. आता आयुष्मानने इंडस्ट्रीतील रेटिंग कल्चरवर भाष्य केलं आहे. संपूर्ण बॉलिवूड (Bollywood) रेंटवर असल्याचं तो म्हणाला आहे. 


आयुष्मान खुराना काय म्हणाला? 


आयुष्मान खुराना म्हणाला,"संपूर्ण बॉलिवूड रेंटवर आहे. तुम्हाला काय वाटतं आम्ही छान-छान कपडे विकत घेत असतो? आम्ही स्टायलिश हायर करतो. हे स्टायलिश त्यांच्या सोर्सने आम्हाला कपडे देत असतात. ते कपडे परिधान केल्यानंतर त्यांना पुन्हा द्यावे लागतात. आम्ही एवढे कपडे घेऊन कुठे जाणार? दिलजीत दोसांझची फॅशन मला आवडते. दिलजीतने आपली फॅशन जागतिक पातळीपर्यंत पोहोचवली आहे. तो कमाल आहे. पूर्वी माझा भाऊ अपारशक्ति माझं स्टाइल पाहत असे. त्याबदल्यात आयुष्मान भावाला पॉकेटमनी द्यायचा. तो माझं स्टाइल करतोय आणि पैसे घरातच राहत आहेत, याचा मला आनंद होता. पुढे तो अभिनेता झाला आणि त्याच्याकडे वेळ नव्हता". 


आयुष्मानचा सिनेप्रवास (Ayushmann Khurrana Movies)


आयुष्मान खुरानाचा 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट शेवटचा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात तो अनन्या पांडेसोबत दिसला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. आयुष्मान आता 'बॉर्डर 2'मध्ये झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या चित्रपटात सनी देओलदेखील मुख्य भूमिकेत आहे. अद्याप अभिनेत्याने याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. अभिनेत्याच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता आहे.


आयुष्मान खुरानाने पत्रकारितेत पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर BIG FM दिल्लीमध्ये RJ म्हणून त्याने काम सुरू केलं. त्यानंतर तो रोडीज या कार्यक्रमात सहभागी झाला. या कार्यक्रमाचा तो विजेतादेखील झाला. पुढे त्याने 'इंडियन आयडल 2'मध्ये भाग घेतला. पुढे 2012 मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.


आयुष्मान खुरानाचे 'टॉप 5' चित्रपट कोणते? (Ayushmann Khurrana Top 5 Movies)


आयुष्मान खुरानाचे 'ड्रीम गर्ल', शुभ मंगल सावधान, बधाई हो, दम लगा के हईशा, बाला हे चित्रपट चांगलेच गाजले आहेत. या चित्रपटांचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलं आहे. आता अभिनेत्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे. आयुष्मानची एकूण संपत्ती 80 कोटी रुपयांच्या आसपास आहे. 


संबंधित बातम्या


Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत आयुष्यमान खुरानाला मिळाली मोठी जबाबदारी, व्हिडीओ आला समोर