Ramayana : The legend of prince Rama : प्रभू श्रीराम अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिरात (Ram Mandir) विधीवत विराजमान झाले आहेत. रामभक्त ज्या ऐतिहासिक क्षणाची एवढी वर्षे वाट पाहत होते तो दिवस अखेर आज आला. रामायणावर आधारित अनेक कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. पण एका सिनेमाला मात्र भारतात बंदी होती.


राम मंदिराच्या उद्घाटनाचा जगभरात जल्लोष


भारतासह परदेशातही मोठ्या संख्येने रामभक्त आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचा जगभरात जल्लोष पाहायला मिळत आहे. न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवरदेखील प्रभू श्रीराम झळकले आहेत. आजवर रामायणावर आधारित अनेक सिनेमे, नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. जपानच्या एका निर्मात्यांनी रामायणावर आधारित सिनेमा बनवला होता. पण त्यावेळी भारतात या सिनेमावर बंदी घालण्यात आली होती. 


जपानी सिने-दिग्दर्शक युको सको 1983 मध्ये भारतात आले होते. त्यावेळी त्यांना रामायणाबद्दल कळलं. रामायणाबद्दल त्यांनी माहिती करुन घेतली. युको सको यांनी रामायणाचे 10 वेगवेगळे वर्जन वाचले. त्यावर अभ्यास केला आणि सिनेमा बनवायला घेतला". 


रामायणावर आधारित सिनेमा भारतात का रिलीज झाला नाही?


युको सको यांच्या रामायणावर आधारित सिनेमाचं नाव 'रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' असं आहे. हा अॅनिमेटेड सिनेमा होता. या सिनेमात भारतात विश्व हिंदू परिषदेने विरोध केला. देवाला कार्टूनचं रूप देऊ नये, असं त्याचं मत होतं. त्यानंतर युको सको यांनी 'रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' या सिनेमामुळे एकाही भारतीयाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, असा विश्वास दिला. त्यानंतर या सिनेमाच्या रिलीजला परवानगी देण्यात आली.  


'रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' हा बिग बजेट सिनेमा होता. 450 कलाकारांचा या सिनेमात सहभाग होता. रामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल यांनी या सिनेमात वॉइस ओव्हर दिला होता. हा सिनेमा पूर्णपणे रिलीजसाठी सज्ज झाला आणि भारतात बाबरी मस्जिदवरुन वाद सुरू झाला. याचा फटका यूगो साको यांना पडला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिलीज केला सिनेमा


'रामायण-द लीजेंड ऑफ प्रिन्स रामा' हा सिनेमा 2022 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रिलीज केला होता. 2022 मध्ये नरेंद्र मोदी आणि यूगो साको यांची भेट झाली होती. जपानीसह इंग्रजी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे.


संबंधित बातम्या


Ram Mandir Inauguration : अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित ते आलिया भट्ट; राम मंदिराच्या उद्घाटनाला अयोध्येत सेलिब्रिटींची मांदियाळी, बॉलिवूडमध्ये आज लॉकडाऊन