Ramayana: अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिराचा (Ram Mandir) उद्धाटन सोहळा आज  मोठ्या उत्साहात पार पडला आहे. या सोहळ्याला  अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. आज राम मंदिराच्या उद्धाटन सोहळ्यानिमित्त तुम्ही रामायणावर आधारित असणाऱ्या  चित्रपट आणि मालिका घरबसल्या पाहू शकता. जाणून घेऊयात रामायणावर आधारित असणारे चित्रपट आणि मालिकांबद्दल...


'द लीजेंड ऑफ लॉर्ड रामा' (The Legend of Lord Rama)



युगो साको आणि राम मोहन दिग्दर्शित अॅनिमेटेड फीचर फिल्म 'द लीजेंड ऑफ लॉर्ड रामा' या चित्रपटात अॅनिमेशनचा वापरून करुण रामायणाचं सुंदर वर्णन केले आहे. हा चित्रपट 1992 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला.  


राम राज्य (Ram Rajya) 



राम राज्य हा चित्रपट 1943 मध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन विजय भट्ट यांनी केलं होतं. या चित्रपटात प्रेम अदिब यांनी प्रभू श्री रामाची भूमिका साकारली होती. हा चित्रपट महात्मा गांधी यांनी देखील पाहिला होता. बद्री प्रसाद, बीना राय आणि शोभना समर्थ यांनी देखील या चित्रपटात काम केलं.


रामायण (Ramayana)



रामानंद सागर यांच्या  रामायण या मालिकेने लाखो प्रेक्षकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. 1987-1988 या दरम्यान ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत भगवान राम, त्यांची पत्नी सीता आणि त्यांचे एकनिष्ठ भक्त हनुमान यांचे जीवन दाखवण्यात आलं आहे.    या मालिकेत अरुण गोविल यांनी प्रभू श्री रामाची तर दीपिका चिखलिया यांनी सीताची भूमिका साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. लॉकडाऊनच्या काळात ही मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आली. त्यावेळी अनेक तरुण पिढीला ही मालिका पाहण्याची संधी मिळाली. 


'आदिपुरुष' (Adipurush)



ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभासने भगवान श्री रामाच्या भूमिका साकारली आहे तर अभिनेता सैफ अली खानने लंकेशच्या भूमिका साकारली आहे, हा चित्रपट बॉक्स-ऑफिसवर आपली छाप पाडू शकला नाही. तर काही प्रेक्षकांनी या चित्रपटातील डायलॉग्सवर आक्षेप घेतला होता.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Ramayana : राम सीतेचा रोल करून घराघरात पोहोचले अन् 'या' 5 टीव्ही स्टारचे अवघं आयुष्य बदलून गेलं