लहानपणी लिफ्टमध्ये लिफ्टमॅनने 'नकोसा स्पर्श' केला होता: अक्षय कुमार
एबीपी माझा वेब टीम | 29 Jul 2017 07:50 AM (IST)
राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या खासगी आयुष्यातली मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली.
मुंबई: राज्य महिला आयोगानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिनेता अक्षय कुमारनं आपल्या खासगी आयुष्यातली मोठी गोष्ट सर्वांसमोर उघड केली. लहानपणी आपण सुद्धा 'नकोसा स्पर्श' अनुभवल्याचा खळबळजनक प्रकार त्यानं सांगितला. लहानपणी मित्राच्या घरी जात असताना, एका लिफ्टमॅननं आपल्याला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला. हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर लिफ्टमॅनविरोधात तक्रार झाली, असं त्याने सांगितलं. मी आईवडिलांसोबत संवाद साधला म्हणून ते याविरोधात योग्य भूमिका घेऊ शकले, असंही त्यानं सांगितलं. राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशन यांनी महिला तस्करीविरोधात मुंबईत एका परिषदेचं आयोजन केलं होतं. त्यावेळी अक्षय कुमार बोलत होता.