Ayan Mukerji On Brahmastra 2 : 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. या सिनेमात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) शिवाच्या भूमिकेत होता तर आलिया (Alia Bhatt) ईशाच्या. 'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते आता या सिनेमाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. दरम्यान नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) 'ब्रह्मास्त्र 2' (Brahmastra 2) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती दिली आहे.
'ब्रह्मास्त्र 2' कधी होणार रिलीज? (Brahmastra 2 Release Date)
'ब्रह्मास्त्र' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अयान मुखर्जीने (Ayan Mukerji) सांभाळली आहे. आता 'ब्रह्मास्त्र 2'बाबत (Brahmastra 2) त्याने महत्त्वाची माहिती दिली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अयान मुखर्जी म्हणाला की, 'ब्रह्मास्त्र 2' या सिनेमावर आमचे काम सुरु असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. पहिल्या भागापेक्षा दुसरा भाग अधिक प्रेक्षणीय असेल. 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाचा दुसरा भाग रिलीज करायला आम्ही 10 वर्षे लावली तर आमचा सिनेमा पाहायला प्रेक्षक येणार नाहीत. येत्या दोन वर्षात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल".
अर्यान मुखर्जी पुढे म्हणाला की, "ब्रह्मास्त्र 2' या सिनेमात मुख्य भूमिकेत कोण असणार याबद्दल अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. रणवीर सिंहपासून यशपर्यंत अनेक नावांची चर्चा आहे. त्यामुळे आता देवच्या भूमिकेत कोण दिसणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. पण देवच्या भूमिकेत कोण असेल हे अद्याप आम्ही ठरवलेलं नाही. प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागेल. या सिनेमाचा दुसरा भाग खूपच रंजक असणार आहे".
ब्लॉकबस्टर 'ब्रह्मास्त्र'!
'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा 2022 मध्ये ब्लॉकबस्टर ठरला होता. अयान मुखर्जी दिग्दर्शित या सिनेमाचं सर्वत्र कौतुक झालं. कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2' या सिनेमालादेखील आलिया-रणबीरच्या 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाने मागे टाकलं. अयान मुखर्जी जवळपास 11 वर्ष या सिनेमावर काम करत होता. सिनेमाची कथा लिहिण्यापासून ते प्रत्यक्षात सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंत 11 वर्षे लागल्याने 'ब्रह्मास्त्र 2'ला किती वर्षे लागतील, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता हा दुसरा भाग येत्या दोन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे 2025 मध्ये 'ब्रह्मास्त्र 2' रिलीज होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
संबंधित बातम्या