Deepika Padukone On 95th Academy Award : बॉलिवूडची 'मस्तानी', 'डिंपल गर्ल' अर्थात दीपिका पादुकोण (Deepika Padukone) सध्या 'पठाण' (Pathaan) या सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनय आणि सौंदर्यामुळे ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाने 'ऑस्कर 2023'मध्ये (Oscar 2023) भारताचे नाव उंचावले आहे. 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणचा समावेश झाला आहे. अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. 


दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा होस्ट करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत दीपिकाच्या नावाचा समावेश आहे. 'ऑस्कर 2023'च्या प्रेझेंटरच्या यादीत दीपिका पादुकोणसह ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, ट्रॉय कोत्सुर, जेनिफर कोनेली, सॅम्युअल एल जॅक्सन, मेलिसा कॅककार्थी, जो सलदाना, डॉनी येन, जोनाथन मेजर्स आणि क्वेस्टलोव या सेलिब्रिटींचाही समावेश आहे. 






जगभरात दीपिकाचा डंका!


दीपिका पादुकोण अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरील कार्यक्रमांमध्ये सहभागी झाली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिकाने भारताचं प्रतिनिधित्व केलं आह. परदेशातील चित्रपट महोत्सवांमध्ये दीपिका हजेरी लावत असते. फीफा वर्ल्ड कपमध्ये दीपिकाने ट्रॉफीचं अनावरणदेखील केलं होतं. दीपिका जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. 


'ऑस्कर 2023' भारतासाठी खास


'ऑस्कर 2023' भारतासाठी खास खूपच खास आहे. यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याचे भारतीये तीन सिनेमे शर्यतीत आहेत. यात एसएस राजामौलींच्या 'आरआरआर' (RRR) या ब्लॉकबस्टर सिनेमाचा समावेश आहे. 'आरआरआर' सिनेमातील 'नाटू नाटू' या गाण्याला 'ओरिजनल सॉंग' या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'ऑल दॅट ब्रेथ्स' या माहितीपटाला 'डॉक्युमेंटरी फीचर फिल्म' या श्रेणीमध्ये नामांकन मिळालं आहे. तसेच 'द एलिफेंट व्हिस्परर्स' या माहितीपटाला सर्वोत्कृष्ट माहितीपटाच्या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालं आहे. 


दीपिकाचे आगामी प्रोजेक्ट


दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे. दीपिकाचा 'फायटर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात 'डिंपल गर्ल' अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. तसेच 'प्रोजेक्ट के' या सिनेमात दीपिका बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 


संबंधित बातम्या


Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार 'नाटू नाटू' वर परफॉर्मन्स; 'हे' कलाकार करणार परफॉर्म