Heropanti 2 New Trailer : ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) आगामी  'हिरोपंती 2' (Heropanti 2) सिनेमाचा नवीन ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये टायगर अॅक्शन करताना दिसत आहे. 


'हिरोपंती 2' सिनेमात टायगर बबलू हे पात्र साकारणार आहे. तर अमृता सिंहने त्याच्या आईची भूमिका साकारली आहे. तसेच नवाजुद्दीन सिद्दीकी या सिनेमात खलनायकाच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या पात्राचे नाव लैला असे आहे. ट्रेलरवरून या सिनेमात अॅक्शनचा तडका असेल याचा अंदाज येतो. प्रेक्षक आता सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 





टायगर श्रॉफ आणि तारा सुतारियाच्या (Tara Sutaria) 'हीरोपंती 2' (Heropanti 2) सिनेमाची प्रेक्षक गेले अनेक दिवस प्रतीक्षा करत होते. पण आता हा सिनेमा ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अहमद खान यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 


संबंधित बातम्या


TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या


Sundar Amche Ghar : सासू-सुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी; गोष्टीची रंगत आता वाढणार


Ayushmann Khurrana : आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'अॅन अॅक्शन हिरो'