Avatar The Way Of Water : 'अवतार : द वे ऑफ वॉटर' (Avatar The Way Of Water) हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. हा सिनेमा आता सिनेमागृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. सिनेमा प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आता या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. रिलीजआधीच या सिनेमाने मार्वल यूनिवर्सच्या सुपरहिट 'डॉक्टर स्ट्रेंज 2' (Doctor Strange 2) या सिनेमाचा रेकॉर्ड मोडला आहे. 


भारतीय सिने-प्रेक्षकांमध्ये हॉलिवूड सिनेमांची क्रेझ दिसून येते. या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. गेल्या काही दिवसांपूर्वी मार्वल स्टुडिओच्या (Marvel Studios) 'थॉर-लव्ह अॅन्ड थंडर' (Thor Love and Thunder) या हॉलिवूड सिनेमाने चांगलाच धमाका केला. त्यामुळे आता प्रेक्षकांना 'अवतार 2'ची (Avatar 2) प्रतीक्षा आहे. 


'अवतार' (Avatar) हा सिनेमा 2009 साली प्रदर्शित झाला होता. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. त्यानंतर आता तेरा वर्षांनी या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेरा वर्षांनी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने या सिनेमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 


'अवतार 2'ची (Avatar 2) भारतात रेकॉर्डब्रेक कमाई!


बॉक्स ऑफिस इंडियाच्या (Box Office India) रिपोर्टनुसार, अवतार : द वे ऑफ वॉटर' या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये भारतात सर्वाधिक कमाई केली आहे. भारतात या सिनेमाने 10 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. रिलीजच्या 10 दिवसांपूर्वी सिनेमाने 10 कोटींपेक्षा अधिक कमाई करणं ही आनंदाची बाब आहे. 'डॉक्टर स्ट्रेंज 2' या सिनेमाने रिलीजच्या नऊ दिवसांपूर्वी 10 कोटींची कमाई केली होती. अशाप्रकारे 'अवतार 2'ने भारतात रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. 


'अवतार 2' कधी होणार रिलीज? 


'अवतार' या सिनेमाने तेरा वर्षांपूर्वी सिनेप्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन केलं होतं. त्यावेळी या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. आता 'अवतार 2' कितीचा गल्ला जमवणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रिलीजआधीच रेकॉर्ड करणारा हा सिनेमा रिलीजनंतर काय-काय रेकॉर्ड करणार याकडे याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. हा सिनेमा 16 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 




संबंधित बातम्या


Avatar 2 : 'अवतार 2'चा रिलीज आधीच रेकॉर्ड; ॲडव्हान्स बुकिंगमध्ये तीन दिवसात 15 हजारहून अधिक तिकीट विक्री