औरंगाबाद : भुवया उडवून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली मल्ल्याळम अभिनेत्री प्रिया वारियर अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. हैदराबादनंतर औरंगाबादेतही प्रिया आणि दिग्दर्शक ओमर लुलूंविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटातील गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे.

औरंगाबादेतील जिन्सी पोलिस ठाण्यात जनजागरण समिती महाराष्ट्र संघटनेने तक्रार दाखल केली आहे. 'ओरु अदार लव्ह' चित्रपटात प्रिया झळकलेल्या 'मणिक्या मलराया पूर्वी' गाण्यातून इस्लाम धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

यूट्यूबवर गाण्याचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर अवघ्या काही तासांतच 10 लाखांपेक्षा जास्त हिट्स या गाण्याला मिळाले. 50 हजारांपेक्षा जास्त यूझर्सनी त्या कालावधीत हा व्हिडिओ लाईक केला होता. लाईक्स आणि व्ह्यूजची संख्या दिवसागणिक वाढतच चालली आहे. इन्स्टाग्रामवर प्रियाच्या फॉलोवर्समध्ये विक्रमी वाढ झाली.

काय आहे व्हिडिओ?

शाळेच्या गॅदरिंगमध्ये एक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थिनीकडे रोखून बघतो. दोघांमध्ये नजरानजर होते आणि 'आँखो ही आँखो में बात हो गई' असा काहीसा प्रकार घडतो. या तरुणीने नजरेने सोडलेल्या बाणाने तिचा मित्र तर घायाळ होतोच, मात्र हा व्हिडिओ पाहणारे नेटिझन्सही गार झाले आहेत.

Exclusive : रातोरात लोकप्रिय झाल्याने घराबाहेर जाणंही बंद झालं : प्रिया प्रकाश


ओमर लुलू यांच्या 'ओरु अदार लव्ह' या मल्ल्याळम चित्रपटातील हे गाणं आहे. 'मणिक्या मलराया पूवी' हे गाणं रिलीज करण्यात आलं असून व्हायरल झालेली क्लीप ही त्याच गाण्याचा एक भाग आहे. हे गाणं शान रहमानने संगीतबद्ध केलं असून विनीथ श्रीनिवासनने गायलं आहे.

कोण आहे प्रिया प्रकाश वारियर?

प्रिया प्रकाश वारियर अवघी 18 वर्षांची आहे. केरळातील थ्रिसूरमधल्या विमला कॉलेजमध्ये ती बीकॉमचं शिक्षण घेते. प्रिया फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. इन्स्टा पेजवर तिचे डान्स, मॉडेलिंग आणि अभिनयाच्या कारकीर्दीतील फोटो पाहायला मिळत आहेत. पहिला सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच तिला दुसरं प्रोजेक्टही मिळालं आहे.

पाहा व्हिडिओ :


संबंधित बातम्या :


'या' क्रिकेटरची प्रिया वारियर मोठी फॅन


इंटरनेट सेन्सेशन प्रियाविरोधात भावना दुखावल्याची तक्रार


आधी डोळे, आता गन शॉट, प्रिया वॉरियरचा नवा व्हिडीओ


'नॅशनल क्रश' प्रिया वॉरियरचा व्हॅलेंटाईन प्लॅन काय? जाणून घ्या


प्रिया वारियरने कतरीनासह सनी लिओनलाही मागे टाकलं!


डोळा मारणारी 'व्हायरल गर्ल' प्रिया आहे तरी कोण?