Shah Rukh Khan: बॉलिवूडचा बादशाह अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) चाहता वर्ग मोठा आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची त्याचे चाहते उत्सुकतेने वाट बघतात. शाहरुखचा जवान हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीव्यू रिलीज करण्यात आला होता. या प्रीव्यूमधील शाहरुखच्या विविध लूक्सनं आणि त्याच्या डायलॉग्सनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. आता शाहरुखनं ट्विटरवर जवान या चित्रपटबाबत चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. 

शाहरुख हा अनेकवेळा ट्विटरवर AskSRK या सेशनच्या माध्यमातून चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. काही नेटकऱ्यांनी शाहरुखला त्याच्या जवान या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारले आहेत. या प्रश्नांना शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

एका चाहत्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'पठाणनं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला, आता जवान चित्रपटाकडून तुला कोणकोणत्या  आपेक्षा आहेत? ' चाहत्याच्या या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं, 'मी तुम्हा सर्वांचे मनोरंजन करू शकेल, एकच आपेक्षा नेहमी असते. आशा आहे की, तुम्हाला हा चित्रपट आवडेल'

'शूटिंग करताना किती वेळा दुखापत झाली?' असा प्रश्न एका नेटकऱ्यानं शाहरुखला विचारला. या प्रश्नाला शाहरुखनं उत्तर दिलं,  'जब तक दिल पे चोट ना लगे बाकी सब चलता है.'

एका नेटकऱ्यानं शाहरुखला प्रश्न विचारला, 'तुझ्या चित्रपटांचे तिकीट तू स्वत:च विकत घेतो?' यावर शाहरुख म्हणाला, 'तुझ्या कामासाठी तू स्वत:ला पगार देतो का?'

जवान चित्रपटामधील शाहरुखच्या लूकचा फोटो शेअर करुन एका नेटकऱ्यानं ट्वीटमध्ये लिहिलं,  'माझा मुलगा हा लूक पाहून घाबरला. तरी देखील आम्ही हा चित्रपट बघणार आहोत.'  नेटकऱ्याच्या या ट्वीटला शाहरुखनं रिप्लाय दिला, सॉरी, पण चित्रपट पाहिल्यानंतर तो घाबरणार नाही.'

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Jawan Prevue : शाहरुखच्या 'जवान'मध्ये 'ही' मराठमोळी अभिनेत्री दिसणार अॅक्शन मोडमध्ये; प्रीव्यूमध्ये दिसली झलक