Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांचा सन्मान सोहळा पार पडला. अशोक सराफ यांना नुकताच  2023 महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला असून त्यांची कारकीर्द, त्यांचा प्रवास आणि अनुभव यावर त्यांची मुलाखत अभिनेत्री सायली संजीवने घेतली व अशोक सराफ यांनी गाजवलेल्या चित्रपटांमधील गाणी देखील सादर करण्यात आली. अनेक दिग्गज कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते. वर्षा उसगावकर, दिलीप प्रभावळकर, सोनाली कुलकर्णी, संस्कृती बालगुडे, प्राजक्ता माळी असे अनेक कलाकार या सोहळ्यासाठी उपस्थित होते.


सायली संजीवने अशोक सराफ यांची मुलाखत घेतली. त्यावेळी ते म्हणाले,"सायली संजीव माझी मानस कन्या आहे.'काहे दिया परदेस'च्या वेळी आम्हाला फोन यायचे की ही तुमची मुलगी आहे का? त्यानंतर मी मालिका पाहिली आणि पाहतच राहिलो". 


राजकारणी लोकांचा अभिनय पाहून अशोक सराफ यांना प्रेरणा मिळते का? 


अशोक सराफ म्हणाले,"प्रेरणा कोणाकडूनही घेता येते. त्यांच्याकडून घ्यायची असं नाही. त्याची खासियत काय हे बघणे गरजेचे". 


अशोक सराफ रमले लक्ष्याच्या आठवणीत


अशोक सराफ म्हणाले,"रंजना अतिशय टॅलेंट असलेली मुलगी. सचिन सगळं बघत शिकलेला व्यक्ती. सिनेमा हिट झाल्यानंतर मायबाप रसिक नेहमी म्हणतात की,"तुम्ही मस्त काम केलं. पण लक्ष्या असता तर अजून मजा आली असती". 


अशोक सराफ यांचा तरुणांना सल्ला


अशोक सराफ तरुणांना सल्ला देत म्हणाले,"तुम्हाला एक सिनेमा मिळाला की काही होत नाही. ते टिकवून ठेवता आलं पाहिजे. तुम्ही डायलॉग बोलता, रोल नाही करत. तुमच्यासमोर कोण आहे ते बघा आणि तसं बोला. वय म्हणतो मी. हे कुणीही करत नाही. सिनेमा करून कुणी स्टार होत नाही. त्यांना गरज नसेल तर नाही घेणार परत. मला एकदा हिंदी सिनेमासाठी बोलवलं. हिरोच्या मित्राचा रोल दिला. नुसतं सिनमध्ये असणं हे चुकीचं, काय करताय ते महत्त्वाचं. नाटक, सिरीयल, सिनेमा कुठेच अस चालत नाही. पाठ करून बोलणे हे चुकीचं. आजकाल तेवढंच आहे. नूतन यांचा मी फॅन. आधी डोळे बोलणार मग ती डायलॉग बोलणार. अशोक कुमार यांच्याबरोबर काम करायला मला आवडलं असतं".


पुणेकरांबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाला,"पुणेकरांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या नाटकाला त्यांचा खूप प्रतिसाद मिळाला आहे. पुण्याचा प्रेक्षक खडूस आहे, असं म्हणतात. पण तसं मला वाटत नाही". 


वाईट आठवणीबद्दल बोलताना अशोक सराफ म्हणाले,"कलाकार स्वतःचा नाही, सगळ्यांचा होऊन जातो. माझे वडील सिरियस होते. काय होईल माहिती नव्हतं. मी वांद्र्यात शूट करत होतो. 
मी एक सीन करून फोन करायचो, भाऊ म्हणायचा सिंकिंग, चौथ्या फोनला म्हणाला ओव्हर. मी आत गेलो, अर्धा राहिलेला सीन पूर्ण केला आणि मग गेलो".


संबंधित बातम्या


Prashant Damle : 'मराठी भाषा गौरव दिना'निमित्त प्रशांत दामलेंची मोठी घोषणा; राज ठाकरे आणि अशोक सराफ यांच्या हस्ते 'तिकिटालय'चा शुभारंभ