Ashish Shelar Asha Bhosle :  ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Asha Bhosle) यांच्यावर 90 मान्यवरांनी लिहिलेल्या 90 लेखांचे आणि  दुर्मिळ छायाचित्रांचे 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी  भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार  आशिष शेलार यांनी काही प्रसंग सांगताच आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले.


आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात म्हटले की,  आजच्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, आशाताई, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत. इतकं मोठं मंच आता जगात कुठेच नसेल. हा अद्वितीय कार्यक्रम  असून मला मंचावर बसण्याची संधी मिळाली आहे.


आमच्या विचारांचं दैवत म्हणजे भागवत जी आणि सुरांची देवता म्हणजे आशाताई आहे, त्यांच्यासोबत  मंचावर बसण्याची संधी मिळाली यापेक्षा दुसरं सुख नाही असे शेलार यांनी म्हटले.  शेलार यांनी सांगितले की, हे पुस्तक तुम्हाला समाधानही देईल. या पुस्तकात चाटूगिरी नाही. हे पुस्तक अमूल्य ठेवा आहे. वैचारिक अधिष्ठान असल्याचे शेलार यांनी सांगितले. 


अन् आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले...


शेलार यांनी म्हटले की, आशाताई केवळ महान गायिका नाही तर महान नायिका सुद्धा आहेत.आमची इच्छा आहे की त्यांनी बायोपिक लिहावं. लहानपणापासून लक्ष्मी रुसली होती पण सरस्वती पावली होती. बालपण या कुटुंबानं गरिबिमध्ये घालवलं. स्वतः खेळायच्या वयात मुलांना सांभाळलं आहे. पती शिवाय मुलांना वाढवण्याचा संघर्ष ताई जगल्या आहेत. पुत्र वियोग आणि पुत्रीची आत्महत्या बघण्याच दुःख त्यांच्या आयुष्यात आले. शेलार यांच्या या वक्तव्यावर आशाताईंच्या डोळ्यात अश्रू तरळले.  यावेळी आशिष शेलार यांनी  पुढे म्हटले की,''भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले! एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!''  ही सुरेश भट यांची कविता आशाताईंसाठी लागू होते असे म्हटले. 


दरम्यान, या कार्यक्रमाच्या वेळी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर,  ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आदी उपस्थित होते.  नरेंद्र हेटे आणि अमेय हेटे यांनी उषा मंगेशकरांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं




इतर संबंधित बातमी :