मुंबई : ‘जानी दुश्मन’ आणि ‘बिग बॉस’ फेम अभिनेता अरमान कोहलीवर मुंबईतल्या सांताक्रुझ पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरमानने त्याची गर्लफ्रेंड नीरु रंधावाला बेदम मारहाण केल्याच्या आरोपात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

नीरु रंधावाच्या डोक्याला जबर मार लागला असून तिच्या तक्रारीनंतर अरमान कोहलीविरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी संध्याकाळी अरमान आणि नीरु यांच्यात पैशांच्या देवाण-घेवाणीवरुन शाब्दिक बाचाबाची झाली.

सध्या नीरुवर अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर अरमान कोहली फरार झाला आहे.

बिग बॉसच्या घरात शिव्या

अरमान कोहली आधीही अनेकदा वादात अडकला होता. बिग बॉसच्या घरात असतानाही त्याचा स्वत:वरील ताबा सुटला होता. त्यावेळी त्याने शिव्या दिल्या होत्या, शिवाय हातघाईवरही तो आला होता. त्यानंतर सोफिया हयात हिच्या तक्रारीनंतर अरमानला अटक करण्यात आली होती. त्यानंतर जामिनावर तो बाहेर आला.

तारक मेहता...मधील बबितालाही मारहाण

तसेच, बिग बॉसच्या घरात जाण्याआधी अरमान कोहलीने ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील बबिता अर्थात मुनमुन दत्तासोबतही डेट केले होते. 2008 साली मुनमुन आणि अरमानमध्ये मैत्री झाली होती, मात्र लवकरच त्यांच्यातील मैत्री संपुष्टात आली. अरमानने मुनमुनलाही मारहाण केली होती.

काजोलच्या बहिणीशी जवळीक

बिग बॉसच्या घरात असताना अभिनेत्री काजोलची बहीण तनिषासोबत अरमानची जवळीक वाढली होती. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

VIDEO :