Arjun Rampal Injured Video : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल  त्याच्या आगामी वेब सीरिजच्या एका कार्यक्रमादरम्यान तो जखमी झाल्याची माहिती आहे. ट्रेलर लाँचवेळी अर्जून रामपालला दुखापत झाली. ट्रेलर लाँच कार्यक्रमात त्याच्या हातातून रक्तस्त्राव होत होता. त्याच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती आहे. काच फोडून स्टेजवर स्पेशल एन्ट्री करताना अर्जून रामपालला दुखापत झाल्याची माहिती आहे. याचा व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्जूनच्या हातातून रक्त वाहत असल्याचं या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे.

अभिनेता अर्जून रामपालला दुखापत

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये अर्जुनच्या हातातून रक्त येत असल्याचं दिसत आहे. 'राणा नायडू 2' च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमात अभिनेत्याला ही दुखापत झाली आहे. नेटफ्लिक्सच्या धमाकेदार राणा नायडू वेब सीरिजचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्सने 2025 वर्षातील चित्रपट आणि सीरीजच्या ट्रेलर लाँचसाठी स्पेशल कार्यक्रम ठेवला होता. यामध्ये अर्जून रामपालला दुखापत झाल्याची माहिती आहे.

कार्यक्रमात स्टंट करणं महागात

अभिनेता राणा दग्गुबती आणि अभिनेता वेंकटेश यांच्या 'राणा नायडू 2' वेब सीरीजची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमात, या सीरीजमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल देखील सहभागी झाला होता. नेटफ्लिक्सने मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात 2025 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी चित्रपटांची आणि मालिकांची घोषणा केली. आता या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन रामपालच्या बोटातून रक्त वाहत असल्याचं दिसून येतं आहे.

अर्जून रामपालला दुखापत कशी झाली?

ट्रेलर लाँच कार्यक्रमात अर्जुन रामपालने काच तोडून स्टेजवर ग्रँड एन्ट्री केली. यादरम्यान, तुटलेल्या काचेमुळे त्याच्या हाताला दुखापत झाली आणि हातातून रक्त येऊ लागलं. बोटांमधून रक्त येत असल्याने तो अस्वस्थ झालेला दिसला. मात्र, त्याचा चेहऱ्यावरील हास्य कायम होतं.

पाहा व्हिडीओ : काच फोडताना भरली हातात