Amitabh Bachchan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा चाहता वर्ग मोठा आहे. बिग बी हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी नेहमी चाहत्यांसोबत शेअर करतात. नुकत्याच एका ब्लॉगमध्ये अमिताभ बच्चन यांनी कोलकाता (Kolkata) येथील ब्लॅकर्स कंपनीतील त्यांच्या नोकरीबाबत सांगितलं.
अमिताभ बच्चन यांनी ब्लॉगमध्ये एका ट्वीटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला. या ट्वीटमध्ये अमिताभ बच्चन यांच्या कोलकाता येथील ब्लॅकर्स कंपनीतील नोकरीचा उल्लेख केला आहे. जेव्हा ब्लॅकर्स कंपनीत अमिताभ हे नोकरी करत होते तेव्हा त्यांना 1640 रुपये पगार होता 30 नोव्हेंबर 1968 हा अमिताभ बच्चन यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस, असंही या ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे. हा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कोलकातामधील आठवणींना उजाळा दिला.
लिहिलं, 'ते दिवस कलकत्ता (आता कोलकाता) मधील होते. फ्री.. फ्रीडम.. फ्रीइस्ट... असे ते दिवस होते. आम्ही 8 जण दहा बाय दहाच्या खोलीत राहात होतो. ऑफिस झाल्यानंतर मित्रांसोबत फिरायचं, मग संध्याकाळी शहरातील लोकप्रिय हॉटेलमध्ये जाण्यासाठी आमच्या पैसे नव्हते. त्या हॉटेलमध्ये प्रवेश करायला पैसे जरी नव्हते, तरी पण त्या हॉटेलच्या बाहेर थांबून आम्ही असा विचार करायचो की कधी तरी तेथे आत जायला मिळेल.'
'आता नव्या प्रोफेशनमध्ये असताना. त्याच शहरात शूटिंग करताना त्या हॉटेल्समध्ये आमंत्रित केले जातं. ते मेजवानी देखील देतात. हा बदल झालाय. नॉस्टॅल्जिया...' बिग बी हे त्यांच्या ब्लॉगमधून वेगवेगळ्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.
अमिताभ बच्चन हे कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतात. या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करतात. अमिताभ बच्चन यांचा 'ऊंचाई' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. तसेच त्यांच्या गुडबाय चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. बिग बींच्या आगमी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
ऊंचाई या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबतच अनुपम खेर, बोमन ईरानी आणि डॅनी डेंगजोप्मा यांनी ऊंचाई या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या स्क्रिनिंगला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या कलाकारांनी चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: