Malaika Arora Pregnancy Rumours : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली असून अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. दोघांना अनेकदा एकत्र स्पॉट करण्यात आलं आहे. दोघांमध्ये वयाचं खूप अंतर असून त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात येतं. पण आता अभिनेत्री प्रेग्नंट असल्याची चर्चा आहे.
"कृपया अफवा पसरवणं बंद करा"; अर्जुन कपूरची नेटकऱ्यांना विनंती
नेटकऱ्यांची शाळा घेत मलायकाच्या प्रेग्नंट असल्याच्या चर्चांबद्दल अर्जुन कपूर म्हणाला,"नकारात्मक, चुकीच्या, खोट्या बातम्या पसरवणं खूप सोप्प आहे. अशा बातम्यामुळे तुम्ही चर्चेत येता पण हे चुकीचं आहे. आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे आमच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडतयं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. पण कृपया अफवा पसरवणं बंद करा. आम्हीपण माणसंच आहोत".
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर गेल्या सहा वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनमध्ये आहेत. अर्जुन कपूरआधी मलायकाने सलमानचा भाऊ अरबाज खानसोबत लग्न केलं होतं. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.
आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू द्या : अर्जुन कपूर
मलायका प्रेग्नंट असल्याची चर्चा याआधीदेखील रंगली होती. त्यावेळी अर्जुनने एक पोस्ट शेअर करत लिहिलं होतं,"अशा खोट्या बातम्यांकडे आम्ही दुर्लक्ष करतो. पण या बातम्या एवढ्या पसरतात की लोकांना त्या खऱ्या वाटतात. आम्हाला आमचं आयुष्य आमच्या पद्धतीने जगू द्या".
मलायका आता 49 वर्षांची आहे. तर अर्जन 37 वर्षांचा. अर्जुन मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. 'इश्कजादे' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. त्याचे गुंडे, तेवर आणि हाफ गर्लफ्रेंड हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. तर दुसरीकडे छैय्या छेय्या या गाण्यामुळे मलायका चांगलीच लोकप्रिय झाली. मलायका आणि अर्जुनच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना आता उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या