Arjun Kapoor Criptic Post : अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर यांचा ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं. एकेकाळी सोशल मीडियावर एकमेकांसाठी प्रेम व्यक्त करणारे अर्जून-मलायका आता एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही दिसत नाहीत. अलिकडेच 23 ऑक्टोबरला मलायका अरोराचा वाढदिवस होता वाढदिवसाच्या निमित्ताने अर्जून कपूरने तिला शुभेच्छा देणारी पोस्ट केली नाही. मात्र, त्याऐवजी त्याने क्रिप्टीक पोस्ट केली. या पोस्टने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. याआधी अर्जून कपूरच्या वाढदिवसाच्या दिवशीही मलायकाने पोस्ट केली नव्हती, त्याच्या बर्थडे पार्टीमध्येही ती दिसली नाही. यामुळे या दोघांचं नातं आता संपलं असल्याचं बोललं जात आहे.
मलायकाच्या वाढदिवसाला अर्जुनची पोस्ट
मलायका अरोराने तिचा 51 वा वाढदिवस साजरा केला, मात्र यावेळी अर्जुन कपूर तिच्यासोबत दिसला नाही किंवा त्याने तिला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या नाहीत. या दरम्यान त्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक रहस्यमय पोस्ट शेअर केली आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. मागील काही काळात ते रिलेशनशिपमध्ये असताना मलायकाच्या वाढदिवसाला अर्जुन सहसा काही खास आणि प्रेमळ मेसेज किंवा पोस्ट शेअर करायचा, पण यावेळी त्याने जे केलं, त्यामुळे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे.
अर्जुन कपूरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
अभिनेता अर्जुन कपूरने एक क्रिप्टीक पोस्ट शेअर केली असूनती सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 'द लायन किंग' चित्रपटातील एक प्रसिद्ध डायलॉग त्याने पोस्टमध्ये शेअर केला आहे. अर्जुन कपूरच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे, 'तू कोण आहेस हे कधीही विसरू नकोस - द लायन किंग'. मुफासा 'द लायन किंग' चित्रपटामध्ये त्याचा मुलगा सिम्बा याच्यासोबत बोलतानाच्या संवादातील हे वाक्य आहे.
मलायका अरोरा-अर्जुन कपूरचा ब्रेकअप झाल्याची चर्चा
या वर्षाच्या सुरुवातीनंतर मलायका आणि अर्जून यांचा ब्रेकअप झाल्याचीबातमी आली होती. मात्र, त्यानंतर मलायकाच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा अर्जुन तिच्यासोबत दिसला. अर्जूनला कठीण काळात मलायकासोबत पाहून चाहत्यांना वाटले की, आता दोघांमध्ये सर्व काही ठीक झालं आहे. पण अर्जून फक्त मानवतेच्या भावनेने तिला सांत्वना देण्यासाठी तिथे आला होता, असं आता चाहत्यांना वाटत आहे. याचं कारण म्हणजे अलीकडेच मलायकाच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त, अर्जूनने तिला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या नाहीत, तर त्याऐवजी एक रहस्यमय स्टोरी पोस्ट केली.
ही पोस्ट मलायकासाठी होती?
अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली, जी व्हायरल होत आहे. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक कोट शेअर केला आहे. 24 ऑक्टोबर रोजी, त्याने लायन किंगचा एक कोट शेअर केला, जो तिच्यासाठी एक गूढ आणि गोड संदेश असल्याचं सांगितलं जात आहे.