Anushka Sharma : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) 15 वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या 'रब ने बना दी जोडी' (Rab Ne Bana Di Jodi) या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात ती बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानसोबत (Shah Rukh Khan) झळकली होती. अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत तिने स्वत:ला सिद्ध केलं. 


अभिनेत्री म्हणून नावारुपाला आल्यानंतर अभिनेत्रीने निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. भावासोबत क्लीन स्लेट फिल्म्स कंपनीची स्थापना केली. या जोडगोळीने आजवर अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती केली आहे. आता ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी अभिनेत्री सज्ज आहे. अभिनेत्रीच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या IMDb ने सर्वाधिक रँकिंग दिलेल्या अनुष्का शर्माच्या 'टॉप 5' सिनेमांबद्दल...


आयएमडीबीने सर्वाधिक रेटिंग दिलेले अनुष्का शर्माचे 'टॉप 5' सिनेमे जाणून घ्या... ( Anushka Sharma Top 5 Movies IMDB Rating)


1. पीके (PK) : अनुष्का शर्माच्या 'पीके' या सिनेमाला सर्वाधिक आयएमडीबी रेटिंग मिळाले आहे. या सिनेमाला 8.1 रेटिंग मिळाले आहे. 2014 साली हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. राजकुमार हिरानी दिग्दर्शित या सिनेमात आमिर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. हा विनोदी सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 


2. रब ने बना दी जोडी (Rab Ne Bana Di Jodi) : अनुष्काचा 'रब ने बना दी जोडी' हा सिनेमा आयएमडीबी रेटिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या सिनेमाला 7.2 रेटिंग मिळाले आहे. आदित्य चोप्राने या सिनेमाच्या लेखन-दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. 2008 साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. या सिनेमात अनुष्का शर्मा आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत होते. 


3. बॅंड बाजा बारात (Band Baaja Baarat) : 'बॅंड बाजा बारात' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 7.2 रेटिंग मिळाले आहे. मनीष शर्मा दिग्दर्शित हा सिनेमा 2010 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. या सिनेमासाठी रणवीरला फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता. 


4. दिल धडकने दो  (Dil Dhadakne Do) : अनुष्का शर्माच्या सर्वोत्कृष्ट सिनेमांत 'दिल धडकने दो' या सिनेमाचा समावेश होतो. जोया अख्तर दिग्दर्शित या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. या सिनेमात अनिल कपूर, शेफाली शाह, प्रियंका चोप्रा, रणवीर सिंह आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. 55 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली होती. 


सुई धागा मेड इन इंडिया (Sui Dhaga Made In India) : अनुष्काच्या 'सुई धागा : मेड इन इंडिया' या सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये 6.8 रेटिंग मिळाले आहे. वरुण धवन आणि अनुष्का शर्मा या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकले. 


संबंधित बातम्या


Anushka Sharma: अनुष्का शर्माला हायकोर्टाचा दणका; विक्री कर विभागाच्या थकबाकी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं याचिका फेटाळली