मुंबई: उरी हल्ल्याचा देशभरातून निषेध होत आहे. देशाच्या सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहतानाच, जशास तसे उत्तर दिले पाहिजे, अशी भावना व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे मात्र, बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला आपल्या भावना अनावर झाल्या आहेत.

तिने या हल्ल्यात शहिदांना श्रद्धांजली वाहतानाच, आपणही एका सैनिकाची मुलगी असल्याचे सांगून, शहिदांच्या कुटुंबीयांचे दु:ख व्यक्त केले आहे. तिने याबाबत ट्वीट करुन आपल्या भावना व्यक्त केल्या.


अनुष्काने आपल्या ट्वीटमध्ये, ''मी एका सैनिकाचीच मुलगी आहे. त्यामुळे मला एखाद्या सैन्यातील कुटुंबामधील त्या व्यक्तीच्या जाण्याने त्यांच्यावर कोणते संकट कोसळते, हे मी जवळून पाहिले आहे. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी जे गमावलं आहे, त्यामुळे माझ्या मनाला अतिशय वेदना होत आहेत.''

अनुष्काचे वडील अजय कुमार शर्माल सैन्य दलात कर्नल पदावर कार्यरत होते. यामुळे अनुष्का शर्माने या भावना व्यक्त केल्या आहेत.