Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माने एक हृदयस्पर्शी व्हिडीओ शेअर केला आहे. कुत्र्याचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला काही लोक वेडा म्हणत होते. परंतु, हा व्हिडीओ शेअर करत अनुष्का शर्मा म्हणाली की, 'वेडे लोक आहेत, ज्यांना माणुसकी दिसत नाही'.


सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती जखमी कुत्र्याबद्दल प्रेम व्यक्त आहे. तो त्या जखमी कुत्र्याला आपल्या मांडीवर घेऊन किस करत आहे. परंतु, हे पाहून शेजारी उभा असलेले लोक त्याला वेडा म्हणत आहेत. त्यानंतर ती व्यक्ती मांडीवरील कुत्र्याला म्हणत आहे की, मी वेडा आहे का? मला सांग, तू मला वेडा म्हणत आहेस का? जो प्राणी बोलू शकत नाही, त्याला तुम्ही शिव्या देत आहात. प्राण्यांची सेवा करावी. हा मुका काहीही बोलू शकत नाही, परंतु, तो सर्वांवर खूप प्रेम करतो, असा संवाद तो व्यक्ती जखमी कुत्र्यासोबत करत आहे. 




हा व्हिडीओ अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करताना तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्यांना माणुसकी समजत नाही ते वेडे आहेत. तुम्ही कौतुकास पात्र आहात." या पोस्टमधून अनुष्काने हार्ट इमोजीही शेअर केली आहे. अनुष्काच्या या पोस्टला अनेकांनी लाईक केले आहे.  


दरमम्यान, अनुष्का बऱ्याच वर्षांनंतर 'चकडा एक्सप्रेस'मधून पुनरागमन करणार आहे. सध्या ती वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या बायोपिकच्या तयारीत आहे.  


महत्वाच्या बातम्या