Anushka Sharma Post: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli ) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ही जोडी सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. विराट आणि अनुष्का हे दुसऱ्यांदा आई-बाबा होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु होती. आता या चर्चेदरम्यान विरुष्कानं सोशल मीडिया मजेशीर पोस्ट शेअर केल्या आहेत. या दोघांच्या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
विराटची पोस्ट
विराट कोहलीनं इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टला कॅप्शन दिलं, 'वर्ल्ड कप स्पर्धेची तारिख जवळ येत असताना, मी माझ्या सर्व मित्रांना नम्रपणे सांगू इच्छितो की, स्पर्धेच्या तिकिटांसाठी मला रिक्वेस्ट करू नका. कृपया मॅचचा पाहण्याचा आनंद आपल्या घरातून घ्या'
विराटची ही पोस्ट इन्स्टाग्रामवर रिपोस्ट करुन अनुष्कानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'आणि यात मी आणखी एक गोष्ट अॅड करते की, जर तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही तर मला मदत करण्याची विनंती करू नका. तुम्ही आम्हाला समजून घेतल्याबद्दल धन्यवाद' अनुष्काच्या या मजेशीर पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
आयसीसी विश्वचषक स्पर्धा 5 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी चेन्नई येथे सामना रंगणार आहे. मॅचपूर्वी अनुष्का आणि विराटने लोकांना मजेशीर पद्धतीने सामन्याची तिकीटं न मागण्याची विनंती केली आहे.
2017 मध्ये अनुष्कानं विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. जानेवारी 2021 मध्ये अनुष्कानं मुलीला जन्म दिला. तिचे नाव वामिका असं आहे. आता अनुष्का ही दुसऱ्यांदा प्रेग्नंट आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
काही दिवसांपूर्वी अनुष्का आणि विराट यांना मॅटर्निटी क्लिनिकच्या बाहेर पापाराझींनी स्पॉट केले होते, पण दोघांनीही पापाराझींना फोटो लीक न करण्याची विनंती केली होती. याच कारणामुळे आता विराट आणि अनुष्का यांच्या घरी एका चिमुकल्या पाहुण्याचे आगामन होणार आहे, अशी चर्चा होऊ लागली आहे.
अनुष्काचा चकदा एक्सप्रेस (Chakda 'Xpress) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात ती भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
काल अनुष्काच्या प्रेग्नन्सीची चर्चा, आज विराट तातडीने मुंबईला परतला