Anurag Kashyap : बॉलिवूडचा लोकप्रिय सिने-दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता अनुराग कश्यप (Anurag Kashyap) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि मत देणं एकसारखं असल्याचं वक्तव्य त्याने केलं आहे.


अनुराग कश्यप हा लोकप्रिय फिल्ममेकर आहे. दर्जेदार सिनेमांसाठी तो ओळखले जातो. त्याचे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. अनेकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे ते चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' या सिनेमाला पाठिंबा देताना तो दिसून येतो. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांने केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. बॉलिवूड सिनेमांच्या यशाबद्दल त्याने भाष्य केलं आहे. 


चांगले सिनेमे पाहायला कोणीही येत नाही : अनुराग कश्यप


अनुराग कश्यप आणि सुधीर मिश्रा यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्याने सिनेमा आणि ओटीटीबद्दल आपलं मत मांडलं आहे. अनुराग म्हणाला,"बॉलिवूडमध्ये चांगले सिनेमे बनत नाहीत असं अनेकांना वाटतं. चांगले सिनेमे प्रदर्शित झाल्यानंतर ते सिनेमागृहात जाऊन पाहण्यापेक्षा ओटीटीवर रिलीज होण्याची प्रेक्षक प्रतीक्षा करतात. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर याचा परिणाम होतो. रिलीजच्या तीन-चार दिवसांनंतर बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडतो. मी चांगले सिनेमे बनवले असूनही ते पाहायला कोणीही गेलेलं नाही".


सिनेमाचं तिकीट खरेदी करणं आणि वोट देणं एकसारखं : अनुराग कश्यप


अनुराग कश्यप पुढे म्हणाला,"तुम्ही जे खरेदी करणार तशाच पद्धतीचे सिनेमे चालणार आणि तशाच पद्धतीचे सिनेमे बनणार".  दरम्यान सुधीर मिश्रा पुढे म्हणाले,"गेल्या 20 वर्षांत अनुरागने बॉलिवूडसाठी बरचं काही केलं आहे. एवढं नॅशनल फिल्म कॉर्पोरेशननेदेखील केलेलं नाही. अनुरागचा मला खूप अभिमान वाटतो". 


अनुराग कश्यपबद्दल जाणून घ्या... (Who is Anurag Kashyap)


अनुराग कश्यप हा बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक आहे. पांच या सिनेमाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकिंग, देव डी, गुलाल, दॅड गर्ल ईन यलो बुट्स आणि गँग्स ऑफ वासेपूर असे त्याने अनेक सिनेमे गाजले आहेत. सत्या या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तर वॉटर या सिनेमासाठी त्याने पटकथालेखन केलं आहे.