Anurag Kashyap Birthday : 'गैंग्स ऑफ वासेपूर' सारखा चित्रपट बनवणार बॉलिवड दिग्दर्शक अनुराग कश्यप याचा आज 10 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. अनुराग कश्यप आज 51 वर्षांचा झाला आहे. अनुराग कश्यपने फिल्म इंडस्ट्रीतील 26 वर्षांच्या कारकिर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी लेखक म्हणून करिअरची सुरुवात करणारा अनुराग कश्यपने लेखक, दिग्दर्शक आणि निर्मिता असण्यासोबतच एक उत्तम अभिनेताही आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपकडे अनेक बॉलिवूड अभिनेत्यांपेक्षाही अधिक संपत्ती आहे.


1998 मधील 'या' चित्रपटाने दिग्दर्शक बनला स्टार


दिग्दर्शक आणि अभिनेता अनुराग कश्यपचा आज वाढदिवस आहे. अनुराग कश्यप असा दिग्दर्शक आहे, जो चित्रपटातून वास्तव मांडतो. अनुरागला खरी ओळख 1998 मध्ये आलेल्या सत्या चित्रपटातून मिळाली होती. या चित्रपटात लेखकाची भूमिका बजावली होती. या चित्रपटाचं खूप कौतूक झालं. सत्या चित्रपटाची स्क्रिप्ट अनुराग कश्यपने लिहिली होती. सत्या चित्रपट बॉलिवूडमधील कल्ट चित्रपटांपैकी एक आहे. 


वास्तववादी चित्रपटांसाठी मिळाली ओळख


अनुराग कश्यपचा जन्म 10 सप्टेंबर 1972 रोजी उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. अनुराग कश्यप वास्तववादी चित्रपटांसाठी ओळखला जातो. चित्रपट लेखनापासून करिअरची सुरुवात करणारा अनुराग डार्क क्राईम थ्रिलर बनवण्यात तरबेज आहे. मात्र, त्याने इतर शैलीतील चित्रपटही केले आहेत. अनुराग कश्यपने आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत पण गँग्स ऑफ वासेपूर चित्रपटामधून त्याला खरी प्रसिद्धी मिळाली.


गँग्स ऑफ वासेपूर ठरला मैलाचा दगड


'गँग्स ऑफ वासेपूर' हा चित्रपट अनुराग कश्यप च्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला. या चित्रपटाने केवळ अनुराग कश्यपला लोकांमध्ये लोकप्रियता दिलीच, त्याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांसारख्या अनेक कलाकारांना रातोरात स्टार बनवलं. अनुराग कश्यपने आतापर्यंत 31 हून अधिक चित्रपट, मालिका आणि शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन केलं आहे. ज्यामध्ये सेक्रेड गेम्स, लस्ट स्टोरी, बॉम्बे वेल्वेट, देव डी, ब्लॅक फ्रायडे आणि नो स्मोकिंग सारख्या दमदार चित्रपटांचा समावेश आहे. अनुराग कश्यपला त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अनुरागला चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत. त्याच्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली आहे.


अजय देवगण अन् संजय दत्तहून अधिक श्रीमंत 


बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यासोबतच अनुराग कश्यपनेही भरपूर कमाईही केली आहे. संपत्तीच्या बाबतीत अनुराग कश्यप संजय दत्त आणि अजय देवगणसारख्या सुपरस्टारपेक्षाही पुढे आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार, अनुरागची एकूण संपत्ती सुमारे 850 कोटी रुपये आहे. अनुराग संजय दत्त आणि अजय देवगणपेक्षाही श्रीमंत आहे.