Stree 2 Box Office Collection Day 25 : अभिनेत्री श्रद्धा कपूर आणि अभिनेता राजकुमार राव स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'स्त्री 2' ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम रचले आहेत. चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत श्रद्धा कपूरने शाहरुख-दीपिकाच्या पठाणला मागे टाकलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फक्त 50 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये बनलेल्या 'स्त्री 2' चित्रपटाने खर्चाच्या 10 पट अधिक कमाई केली आहे, यावर विश्वास बसणं अनेकांना कठीण झालं आहे. 


भारतातील सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट


स्त्री 2 चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर पठाण आणि गदर 2 चित्रपटाच्या कमाईचा विक्रम मोडला आहे. 15 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'स्त्री 2' ने रिलीजच्या 25 व्या दिवशी कमाई करून ही कामगिरी केली आहे. यासह स्त्री 2 भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दीपिका आणि शाहरुखच्या पठाणचा रेकॉर्डही स्त्री 2 चित्रपटाने मोडला आहे.


‘स्त्री 2’ ने ‘पठाण’ अन् ‘कल्कि’ला टाकलं मागे


श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या स्त्री 2 चित्रपटाने अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे आणि अजूनही याची कमाई सुरुच आहे. चौथ्या वीकेंडला या चित्रपटाने सुमारे 23.50 कोटी रुपयांची कमाई केल्याची माहिती आहे. स्त्री 2 चित्रपटाने आता शाहरुख खानच्या पठाण आणि गदर 2 च्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनला मागे टाकले आहे. यामुळे स्त्री 2 आता हिंदी चित्रपटसृष्टीतील दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 




बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये नवीन रेकॉर्ड्स


सकनीलकच्या रिपोर्टनुसार, रविवारी चित्रपट रिलीज झाल्यानंतर 25 व्या दिवशी स्त्री 2 चित्रपटाने रात्री 10:30 वाजेपर्यंत 10.75 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. स्त्री 2 चित्रपटाची एकूण कमाई 550.79 कोटींवर पोहोचली आहे. यासह स्त्री 2 हा पठाणला मागे टाकत बॉलीवूडचा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 


जवान


सप्टेंबर 2023 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाने 25 व्या दिवशी एकूण 9.12 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.


केजीएफ चॅप्टर 2


एप्रिल 2022 मध्ये प्रदर्शित केजीएफ चॅप्टर 2 हिंदी आवृत्तीने 25 व्या दिवशी 6.25 कोटी रुपयांची कमाई केली.


कल्कि 2898 एडी


प्रभास आणि दीपिका पदुकोणचा चित्रपट कल्की 2898 एडी चित्रपटाने 25 व्या दिवशी 4.85 कोटी रुपयांची कमाई केली.


पद्मावत


रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर यांचा 'पद्मावत' चित्रपटाने 25 व्या दिवशी 4.06 कोटी रुपये कमावले.


पठाण


जानेवारी 2023 मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख आणि दीपिका पदुकोणच्या 'पठाण' चित्रपटाने 25 व्या दिवशी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Deepika Padukone Baby Photo : दीपिका-रणवीरच्या मुलीची पहिली झलक, चिमुकलीचा फोटो सोशल मीडियावर फोटो व्हायरल; सत्य काय?