Anupam Kher Latest Video: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर विविध पोस्ट शेअर करत असतात. अनुपम खेर हे दिग्दर्शक अनुराग बसुच्या 'मेट्रो इन दिनों' (Metro In Dino) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकताच अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अनुराग बसु  (Anurag Basu) हा अनुपम खेर यांच्यासाठी 'अंडा डोसा' बनवताना दिसत आहे.


अनुपम खेर यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये 'मेट्रो इन दिनो' चित्रपटाचा दिग्दर्शक अनुराग बसु हा चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेरसाठी अंडा डोसा बनवताना दिसत आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनुपम खेर यांनी लिहिले आहे की, 'आजची बातमी, अनुराग बसुने 'मेट्रो इन दिनों'च्या सेटवर माझ्यासाठी अंड्याचा डोसा बनवला आहे. अंड्याचा डोसा खाल्ल्यानंतर अनुपम यांनी अनुरागचे कौतुक केले. चित्रपटात भूमिकाही चांगली दिली आणि डोसाही उत्कृष्ट दिला. काहीही होऊ शकते. अनुराग बाबू की जय हो.' अनुपम खेर यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.


पाहा व्हिडीओ: 






दिग्दर्शक अनुराग बासुच्या 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. या चित्रपटात अनुपम खेर व्यतिरिक्त अभिनेता आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, अली फजल, नीना गुप्ता, कोंकणा सेन आणि फातिमा सना शेख यांसारखे सेलिब्रिटी देखील महत्वाचे भूमिका साकारणार आहेत. 'मेट्रो इन दिनों' या चित्रपटाच्या रिलीज डेटची अजून घोषणा करण्यात आलेली नाही.


अनुपम खेर यांचे चित्रपट


'कर्मा', 'तेजाब', 'राम लखन', 'दिल', 'सौदागर', '1942 ए लव स्टोरी', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'हम आपके हैं कौन' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनुपम यांनी काम केले.  गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या द कश्मीर फाइल्स या चित्रपटातील अनुपम यांच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.   त्यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Anupam Kher: खिशात 37 रुपये घेऊन गाठली मुंबई, आज आहेत कोट्यवधींचे मालक; अनुपम खेर यांची स्ट्रगल स्टोरी जाणून घ्या