बॉक्स ऑफिसवर 'जंगल जंगल सुसाट चली है...'
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2016 12:33 PM (IST)
मुंबई : डिस्नेचा लाईव्ह-अॅक्शन अॅडव्हेंचर सिनेमा 'द जंगल बुक'ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट चालली आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 9.76 कोटी रुपयांचा गल्ला जमवत विक्रमी वाटचाल केली आहे. 8 एप्रिलला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सिनेमाला सुट्टीमुळे पहिल्याच दिवशी चांगली ओपनिंग मिळाली. तीन दिवसांच्या लाँग विकेंडचा फायदा चित्रपटाला मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांना लागलेल्या सुट्ट्यांचाही फायदा सिनेमाला होणार आहे. अक्षयकुमारच्या एअरलिफ्टनंतर जंगल बुक हा 2016 मधला सर्वात मोठं ओपनिंग मिळालेला दुसऱ्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. बॉलिवूड ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. https://twitter.com/taran_adarsh/status/718657650754322432