पुणे : ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी आज फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. अनुपम खेर यांनी ट्विटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांना अनुपम खेर यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा आपला अनुभव खूप चांगला होता. खूप काही शिकायला मिळालं, मात्र अमिरेकेतील टीव्ही शोसाठी मला अमेरिकेत राहणं अवश्यक असल्याने एफटीआयआयला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. म्हणून मी अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असं अनुपम खेर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
विविध आंदोलनांमुळे प्रसिद्ध असलेल्या एफटीआयआयमध्ये सध्याही शूटींगसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध नाहीत, म्हणून विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. त्यात अनुपम खेर यांनी अचानक अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
एफटीआयआयचे अद्यक्ष अनुपम खेर यांनी राजीनामा दिल्यांनातर एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एफटीआयआयचे अद्यक्ष म्हणून ते फक्त 3 वेळा एफटीआयआयमध्ये आले. तसंच त्यांच्याशी पत्र व्यवहार केल्यास फार उत्तर मिळायची नाहीत. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत तसेच आहेत. ते सोडवले गेले नाहीत. त्यामुळे नवीन येणारे चेअरमन हे एफटीआयआयला भरपुर वेळ देणारे असावेत अशी इच्छा या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
अनुपम खेर यांचा एफटीआयआय च्या अध्यक्षपदाचा राजीनामा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Oct 2018 05:13 PM (IST)
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री हर्षवर्धन राठोड यांना अनुपम खेर यांनी आपला राजीनामा पाठवला आहे. अभिनेते गजेंद्र चौहान यांच्या अध्यक्षपदावरुन झालेल्या मोठ्या वादानंतर, गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनुपम खेर यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -