FTII सोसायटीच्या सदस्यपदी अनुप जलोटा, हिरानी, कंगना
एबीपी माझा वेब टीम | 26 Sep 2018 08:40 PM (IST)
FTII सोसायटीच्या सदस्यपदी राजकुमार हिरानी, विधू विनोद चोप्रा, डॅनी डेंग्झोप्पा, अरविंद स्वामी, सतीश कौशिक, कंगना राणावत, दिव्या दत्ता, येशुदास यांची वर्णी लागली आहे.
पुणे : 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया' अर्थात 'एफटीआयआय'च्या सोसायटीच्या सदस्यांमध्ये भजनसम्राट अनुप जलोटा यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून ही निवड करण्यात आली आहे. एफटीआयआय सोसायटीच्या सदस्यांमध्ये बॉलिवूडमधील अनेक नामवंत कलाकारांची वर्णी लागली आहे. यामध्ये अनुप जलोटांसोबत दिग्दर्शक राजकुमार हिरानी, निर्माते विधू विनोद चोप्रा, अभिनेते डॅनी डेंग्झोप्पा, अरविंद स्वामी, सतीश कौशिक, अभिनेत्री कंगना राणावत, दिव्या दत्ता, संगीतकार येशुदास यांचा समावेश आहे.