Pedro Henrique Died: ब्राझिलियन गॉस्पेल गायक पेड्रो हेनरिक (Pedro Henrique) यांचे स्टेजवर परफॉर्म करताना निधन झाले. 13 डिसेंबर रोजी पेड्रो हा एका कार्यक्रमात स्टेजवर लाईव्ह परफॉर्मन्स देत होता.  त्यावेळी तो अचानक स्टेजवर  कोसळला. पेड्रो हेनरिकच्या रेकॉर्ड लेबल, टोडा म्युझिकने पुष्टी केली की, पेड्रोचा मृत्यू  हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं झाला. पेड्रो हेनरिक हा 30 वर्षांचा होता. पेड्रो हेनरिकच्या निधनानं त्याच्या चाहत्यांना आणि त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे.


 हेनरिकच्या मृत्यूनंतर, त्याच्या रेकॉर्ड लेबल टोडा म्युझिकने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये लिहिलं आहे, "पेड्रो एक आनंदी व्यक्ती होता, तो सर्वांचा मित्र होता.". पेड्रो हेनरिक हा एका कार्यक्रमात   'वै सेर ताओ लिंडो'  हे त्याचे हिट गाणे गात होता, जे ईशान्य ब्राझीलमधील फेरा डी सांताना शहरातील कॉन्सर्ट हॉलमधून ऑनलाइन प्रसारित केले गेले, हे गाणे गात असतानाच पेड्रो स्टेजवर कोसळला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. 


पेड्रो हेनरिकचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये पेड्रो हेनरिक हा गाणे गाताना दिसत आहे. यावेळी तो स्टेजवर अचानक कोसळतो, असं दिसत आहे.  तो अचानक स्टेजवर पडल्याचे पाहून त्याच्या बँडचे सदस्य आणि  प्रेक्षक हादरतात. नंतर त्याला जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.  


टोडा  म्युझिकने एका इंस्टाग्रामवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, "हा आयुष्यातील खूप कठीण प्रसंग आहे ज्याबद्दल बोलायला आमच्याकडे शब्द नाहीत. आम्हाला फक्त हे समजून घेणे आवश्यक आहे की, ही देवाची इच्छा आहे."  टोडा  म्युझिक या रेकॉर्ड लेबलने पेड्रो हेनरिकला सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन श्रद्धांजली वाहिली.






पेड्रो हेनरिकचे कुटुंब (Pedro Henrique Family) 


पेड्रो हेनरिकच्या पश्चात त्यांची पत्नी सुइलान बॅरेटो आणि त्यांची मुलगी आहे. त्यांच्या मुलीचा जन्म 19 ऑक्टोबर रोजी झाला.पेड्रो हेनरिकनं  2015 मध्ये त्याच्या प्रेफेशनल करिअरला सुरुवात केली, जेव्हा त्याने त्याच्या YouTube चॅनेलवर काही गाणी अपलोड केली.  हेनरिकने 2019 मध्ये   'Não Falhou' हे गाणे रिलीज केले.


संबंधित बातम्या:


Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास