Antim : The Final Truth : सलमान खान (Salman Khan) आणि आयुष शर्माचा (Aayush Sharma) 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा येत्या 26 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे काही दृश्ये पुणे पुणे शहरात शूट झाली आहेत. त्यामुळेच या सिनेमाच्या प्रमोशनसाठी सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर पुण्याला गेले होते. 


या सिनेमाचे शूटिंग सुरू होताच पुणेकरांच्या प्रेमाने शूट बंद करायची वेळ आली होती. कारण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. प्रमोशन दरम्यान पुणेकरांसोबत संवाद साधताना सलमान खान म्हणाला, "पुणेकरांच्या प्रेमाची मला मोठी किंमत मोजावी लागली. कारण हा सेट मुंबईत पुन्हा उभारण्यासाठी मला मोठा खर्च करावा लागला. त्यामुळे आता माझा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर माझं आणखी नुकसान करू नका. सिनेमागृहात जाऊन सिनेमाचा आस्वाद घ्या". अशाप्रकारे सलमान खानने चाहत्यांना चांगलीच साद घातली आहे.


 


'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 'भाई का बर्थडे', 'होने लगा' आणि 'चिंगारी' अशी सिनेमातील हटके गाणी प्रदर्शित झाली आहेत. 


संबंधित बातम्या


Antim : सलामान खान, आयुष शर्मा आणि महेश मांजरेकर 'अंतिम'च्या प्रमोशनसाठी पुण्याला रवाना


Atrangi Re Trailer : Akshay Kumar च्या 'अतरंगी रे' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित


Honsla Rakh On OTT : प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली, Shehnaaz Gill चा 'हौसला रख' प्रेक्षकांच्या भेटीला


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha