Antim : सलमान खानचा (Salman Khan) 'अंतिम : द फायनल ट्रुथ' (Antim: The Final Truth) सिनेमा प्रदर्शित होण्याची चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. सलमान खान आणि आयुष शर्माचा (Aayush Sharma) 'अंतिम' सिनेमा आज देशभरातील सिनेमागृहांत प्रदर्शित झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी मुंबईतील एका मल्टिप्लेक्समध्ये 'अंतिम' सिनेमाचे भव्य प्रीमिअर आयोजित करण्यात आले होते. या प्रीमिअरला सलमानदेखील उपस्थित होता. सूर्यवंशी सिनेमानंतर सलमान खानचा 'अंतिम' सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे. 


बॉलीवूडचा सुपरस्टार सलमान खान पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकत आहे. 'अंतिम' सिनेमाची चाहते गेले अनेक दिवस वाट बघत होते. पण आता त्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रेक्षक सिनेमागृहात जाऊन सुपरस्टार सलमानचा 'अंतिम' सिनेमा बघत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सलमानच्या कामाचे कौतुकदेखील करत आहेत.


 


'अंतिम : द फायनल ट्रुथ' हा सिनेमा 'मुळशी पॅटर्न' या सुपरहिट मराठी चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'अंतिम' सिनेमात सलमान खान एका शूर पोलिसाच्या भूमिकेत दिसतो आहे. तर सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा गुंडाच्या भूमिकेत दिसतो आहे. या सिनेमाच्या माध्यमातून महिमा मकवानाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. सलमान खान आणि आयुष शर्माची जोडी पहिल्यांदाच या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. सिनेमातील भाई का 'भाई का बर्थडे' गाणे चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. सलमानच्या लूकची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानचे चाहते त्याच्या नव्या लूकचा फोटो आणि व्हिडीओ शेअर करत त्याच्या अभिनयाचं कौतुक करत आहेत. 


 


संबंधित बातम्या


Antim चित्रपटातील सलमानचा लूक व्हायरल, ट्विटरवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव


Antim : सलमान खानला पुणेकरांच्या प्रेमाची मोजावी लागली मोठी किंमत


83 Teaser Out: बहुचर्चित '83' चा टीजर आला, ट्रेलर आणि रिलिजच्या तारखाही ठरल्या, दीपिकानं दिली माहिती


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha