मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतपाठोपाठ त्याची एक्स गर्लफ्रेण्ड अंकिता लोखंडेही मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. लवकरच अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
लोकप्रिय टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता'मध्ये अंकिता आणि सुशांतसिंह राजपूत झळकले होते. या मालिकेच्या माध्यमातून ही जोडी घराघरात पोहोचली होती. या जोडीने पद्यावर आणि पद्यामगे आपल्या चाहत्यांच्या मनात एक छाप सोडली आहे. पण आता ही जोडी वेगळी झाली आहे.
काही दिवसांपूर्वीच सुशांत - अंकिताचं ब्रेकअप झालं आहे.
सुशांतसिंह राजपूतने 'काय पो छे' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली होती. आता अंकिताही त्याच्या पावलावर पाऊल टाकणार आहे. अंकिता एका स्क्रिप्टवर काम करत आहे. अंकिता ही स्क्रिप्ट लवकरच साईन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ब्रेकअपनंतर अंकितानेही करिअर मनावर घेतलं आहे.
दुसरीकडे सुशांतसिंह राजपूत 'एम एस धोनी- द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.