Animal Box Office Collection Day 4 : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) अभिनीत 'अ‍ॅनिमल' (Animal) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कामगिरी करत आहे. रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पैशांचा पाऊस पाडतो आहे. लवकरच हा सिनेमा 250 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रणबीरच्या या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.


'अ‍ॅनिमल'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Animal Box Office Collection)


'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 1 डिसेंबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'अ‍ॅनिमल'ने ओपनिंग डेला 63.8 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी 66.27 कोटी, तिसऱ्या दिवशी 71.46 कोटी आणि चौथ्या दिवशी 39.9 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या चार दिवसांत या सिनेमाने 241.43 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर जगभरात या सिनेमाने 356 कोटींची कमाई केली आहे. 400 कोटींचा टप्पा पार करण्यास हा सिनेमा सज्ज आहे. 


पहिला दिवस : 63.8 कोटी
दुसरा दिवस : 66.27 कोटी
तिसरा दिवस : 71.46 कोटी
चौथा दिवस : 39.9 कोटी
एकूण कमाई : 241.43 कोटी


'अ‍ॅनिमल'ने तोडला 'गदर 2','टायगर 3' आणि 'पठाण'चा रेकॉर्ड


'अ‍ॅनिमल'चा बॉक्स ऑफिसवर चांगलाच बोलबाला आहे. दिवसेंदिवस हा सिनेमाची चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे. 'अॅनिमल'ने रिलीजच्या चार दिवसांत 241.43 कोटींची कमाई केली आहे. आता या सिनेमाने 'गदर 2', 'टायगर 3' आणि 'पठाण'चा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. 


- 'जवान'ची चार दिवसांची कमाई - 286 कोटी रुपये
- 'अ‍ॅनिमल'ची चार दिवसांची कमाई - 241.43 कोटी रुपये
- 'गदर 2'ची चार दिवसांची कमाई - 173.58 कोटी रुपये
- 'पठाण'ची चार दिवसांची कमाई - 220 कोटी रुपये
- 'टायगर 3'ची चार दिवसांची कमाई - 169.15 कोटी रुपये


'अ‍ॅनिमल' हा सिनेमा रिलीजच्या पाच दिवसांत 250 कोटींचा टप्पा पार करणार आहे. रणबीर कपूर (Ranbir Kapoor), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि बॉबी देओल (Bobby Deol) या तिघांच्याही करिअरमध्ये 'अ‍ॅनिमल' या सिनेमाचा मोलाचा वाटा आहे. संदीप रेड्डी वांगा (Sandeep Reddy Vanga) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.


'अ‍ॅनिमल' हा सिनेमा 3 तास 21 मिनिटांचा आहे. देशभरात 4000 स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. आता हा सिनेमा शाहरुखच्या 'जवान'चा रेकॉर्ड ब्रेक करतो का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 'अ‍ॅनिमल' या सिनेमाची रणबीरची चॉकलेट बॉय आणि रोमँटिक हिरोची इमेज ब्रेक केली आहे. या सिनेमात तो अ‍ॅक्शन मोडमध्ये पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


Animal Review : रणबीरच्या अभिनयाने सजलेली हिंसक कथा