मुंबई:  आम्रपाली ग्रुप जाहिरात वादावरून अभिनेता अनिल कपूरनेही टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीची पाठराखण केली आहे. धोनीबाबत जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे, असं अनिल कपूरने म्हटलं आहे.


 

"कुठल्याही ब्रँडची जाहिरात करताना आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात. पण एका ठराविक काळानंतर कंपनीच्या वैधतेवर किंवा विश्वासाबाबत आपण अंदाज बांधू शकत नाही. त्यामुळे धोनीबाबत जे झालं ते दुर्दैवी आहे," असं अनिल कपूरने नमूद केलं.

 

दुसरीकडे मला ज्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे, त्याच ब्रँडची मी जाहिरात करतो, असंही अनिल कपूर म्हणाला.

 

शाहरुखकडूनही पाठराखण

यापूर्वी किंग खान शाहरुखनेही धोनीची पाठराखण केली होती. कॅप्टन कूल धोनीचा बचाव करताना शाहरुख म्हणाला होता, ‘ब्रँडची जाहिरात करणारे सेलिब्रिटी जबाबदार नाहीत. मात्र, कोणत्याही उत्पादनाची जाहिरात करताना सेलिब्रिटींनी त्या उत्पादनाची खात्री करून घेणं गरजेचं आहे. पण उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत सेलिब्रिटींना जबाबदार धरता येणार नाही, असा बचावात्मक पवित्रा शाहरूखनं घेतला.

 

'आम्रपाली'च्या ब्रँडअम्बेसेडरपदावरून धोनी पायउतार

महेंद्रसिंह धोनी हा बांधकाम क्षेत्रातील कंपनी आम्रपाली ग्रुपच्या ब्रँडअम्बेसेडरपदी होता. ‘आम्रपाली‘ने नोएडा येथे सॅफायर नावाच्या प्रकल्पाची जाहिरात धोनीने केली होती.  मात्र आम्रपाली बिल्डरने वेळेत घरं न दिल्याने या घरांच्या जाहिराती करणाऱ्या धोनीविरोधात सोशल मीडियावर मोहिम उघडण्यात आली होती. धोनीने आमची घरं मिळवून द्यावी, अशी मागणी सोशल मीडियावर होत होती.

 

सोशल मीडियातील टीकेनंतर धोनीने या कंपनीसोबतचा करार रद्द करून ब्रँडअम्बेसेडरपदावरून पायउतार झाला होता.

 

6 वर्ष जुनं तोडलं

 

आम्रपाली बिल्डर्स आणि कॅप्टन कूल माही यांचं नातं 6 वर्ष जुनं होतं. जेव्हा धोनी स्टार नव्हता, तेव्हा आम्रपाली बिल्डर्सने त्याच्याकडे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांच्या प्रत्येक नव्या प्रोजेक्टसाठी धोनीचाच चेहरा वापरण्यात येत होता. मात्र याच नात्यामुळे धोनीचे हात दगडाखाली आले. आम्रपाली बिल्डरच्या आडमुठेपणामुळे जेरीस आलेल्या ग्राहकांनी ट्विटरवर धोनीविरोधातच मोहीम सुरु केली होती.

 

या प्रकारानंतर धोनीने आम्रपालीसोबतचा करार संपुष्टात आणला.

 

संबंधित बातम्या


'आम्रपाली'सोबतच्या ब्रेकअपनंतर भज्जी म्हणाला, वेल डन धोनी !


धोनी आणि आम्रपाली ग्रुपचं ब्रेकअप !


धोनी आम्हाला घर मिळवून दे, ‘आम्रपाली’च्या ग्राहकांचा तगादा


फसव्या जाहिरातीतील सेलिब्रेटींना 10 लाख दंड आणि तुरुंगवास?


‘सेलिब्रेटींना जबाबदार धरता येणार नाही’, धोनीच्या बचावासाठी किंग खान सरसावला