Anil Kapoor Filmy Career : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक नाव म्हणजे अनिल कपूर. मिस्टर इंडिया, लाडला, तेजाब यासारख्या हिट चित्रपटांतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय कौशल्याच्या बाबतीत अनिल कपूरही सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा कमी नाही. पण, अनेकांना माहित नसेल की, बिग बींमुळे अनिल कपूर यांना खरा स्टारडम मिळाला. अमिताभ बच्चन यांच्या एका चुकीमुळे अनिल कपूर सुपरस्टार झाले.


अमिताभ बच्चन यांची एक चूक अन् अनिल कपूर बनले सूपरस्टार


अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक अभिनेत्यांनी 1990 मध्ये एक चित्रपट नाकारला होता, ज्यामुळे अनिल कपूर यांना खरी प्रसिद्धी मिळाली. अमिताभ बच्चन यांनी नाकारलेला 1990 चा चित्रपट अनिल कपूर यांनी केला नसता तर कदाचित त्यांची कारकीर्द एवढ्या उंचीवर पोहोचली नसते. अनिल कपूरच्या आधी अमिताभ बच्चन यांना 1990 मध्ये आलेला 'किशन कन्हैया' चित्रपट ऑफर झाला होता. पण अमिताभ बच्चन यांनी ही ऑफर नाकारली, त्यामुळे अनिल कपूर यांनी नशीब मात्र फळफळलं.


अमिताभ यांनी नाकारलेला चित्रपट ठरला हिट


1990 मध्ये अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांचा 'आज का अर्जुन' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि बॉलिवूडमध्ये बिग बींचा दर्जा वाढला. 'आज का अर्जुन' हा 1990 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला, पण त्याच वर्षी अमिताभ यांनी एक मोठी चूक केली. 'आज का अर्जुन'च्या यशानंतर त्यांनी एक चित्रपट नाकारला, जो दुसऱ्या अभिनेत्याने केला आणि चित्रपट सुपरहिट ठरला. ज्यामुळे अभिनेत्याला स्टारडम मिळाला.


या चित्रपटामुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार


अमिताभ बच्चन यांना माधुरी दीक्षितसोबत 'किशन कन्हैया' हा चित्रपट नाकारला. 1990 मध्ये आलेल्या किशन कन्हैया चित्रपटामुळे अनिल कपूर यांना प्रसिद्धी मिळाली, पण या चित्रपटासाठी सर्वात आधी बिग बींना विचारण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन यांना  चित्रपटाची ऑफर आली होती, ज्यासाठी त्यांनी नकार दिली. अमिताभ बच्चन यांनी 'किशन कन्हैया' चित्रपटात काम केलं असते तर 1990 मध्ये ते दोन सुपरहिट चित्रपट देऊन बॉक्स ऑफिस.


कौतुक आणि सुपरस्टारचा दर्जा


DNAIndia.com च्या रिपोर्टनुसार, अमिताभ यांनी नकार दिल्यानंतर अनिल कपूर यांना हा चित्रपट ऑफर करण्यात आला होता. या चित्रपटात अनिल कपूर यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती, ज्याचं खूप कौतुक झालं. 'किशन कन्हैया'  चित्रपटात त्यांनी माधुरी दीक्षितच्या विरुद्ध मुख्य भूमिका साकारली आणि अनिल कपूर यांना सुपरस्टारचा दर्जा मिळाला. 


चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट


'किशन कन्हैया'  चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला आणि 1990 मधील चौथा सर्वाधिक कलेक्शन करणारा चित्रपट असल्याचं म्हटलं जातं. त्या वर्षी अनिल कपूरच्या आणखी दोन चित्रपटांचा टॉप 10 चित्रपटांच्या यादीत समावेश झाला. यानंतर त्यांच्यावर निर्मात्यांचा विश्वास वाढला आणि मग त्यांनी मागे वळून पाहिलं नाही.


अभिनेता अनिल कपूर यांनी 1979 मध्ये 'हमारे तुम्हारे' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 'मेरी जंग', 'कर्मा', 'मिस्टर इंडिया' आणि 'तेजाब' यासारखे हिट चित्रपट दिले आहेत. अनिल कपूर सध्या 67 वर्षांचे असून आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रीय आहेत. त्यांनी अनेक वेब सीरिजमध्येही काम केलं आहे.