कंगना, तू जेव्हा आलीस तेव्हाच मीही आले होते इंडस्ट्रीत. तुला काही सुचत नाही तेव्हा तू बडबड बडबड करू लागतेस. मी तुला बरोबर ओळखलं आहे. तू बॉलिवूडमध्ये आलीस आणि विवाहित लोकांच्या संसारात तू घुसलीस. तुझा तोच स्वभाव आहे, असं कंगनाला थेट सुनावलं आहे राखी सावंतने.


राखीने केलेली एक क्लिप व्हायरल होते आहे. यात कंगनाचा तिच्याच शब्दात राखीने समाचार घेतला आहे. कंगनाने मुंबईला नावं ठेवल्यानंतर अनेक कलाकारांनी मुंबई आपली कशी लाडाची आहे. ती आपली कशी क्रमभूमी, मायभूमी आहे हे सोशल मीडियावर सांगितलं होतं. पण त्या पलिकडे जात राखी सावंतने केवळ मुंबई, महाराष्ट्राचं कौतुकच नाही केल, तर कंगनाला खडे बोलही सुनावले आहेत.


कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचा कंगाना काय अधिकार? निवृत्त पोलिसाची कोर्टात याचिका


राखीने व्हायरल केलेल्या क्लिपमध्ये ती म्हणते, कंगना, मी तुला चांगली ओळखून आहे. तू बॉलिवूडमध्ये आलीस आणि विवाहित पुरुषांच्या संसारात तू घुसलीस. ह्रतिक रोशन, आदित्य पांचोली ही नावं आहेतच. शिवाय इतरही हजारो लोकांच्या संसारात तू घुसली आहेस. संसारी माणसाच्या आयुष्यात घुसून तू त्यांचा संसार मोडतेस. आणि मग त्याने मला असं केलं. त्याने मला तसं केलं. तो मला असं म्हणाला.. तसं म्हणाला असं सांगत सुटतेस. तुझा घाणेरडा स्वभाव याला कारणीभूत आहे. आता तू जी मधल्यामध्ये लटकते आहेस ना कारण, सगळ्या बॉलिवूडने तुला आजवर सहन केलं आहे. तू म्हणजे सौ चुहे खा के बिल्ली हज को चली अशी आहे. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नको. सुशांतच्या मृत्यूचा फायदा करवून घेऊन पब्लिसिटीच्या मागे लागू नको. '





राखीने सुशांतबद्दलही सहानुभूती व्यक्त केली आहे. ती म्हणते, "मला माहितीये, सुशांतचं जाणं हे धक्कादायक आहे. पण त्याच्या नावानं तू स्वत:चा फायदा करून घेऊ नको. महाराष्ट्रात सगळ्यांची स्वप्नं पूर्ण होतात. ही स्पप्ननगरी आहे. माझं माझ्या राज्यावर मुंबईवर खूप प्रेम आहे.'


Rakhi Sawant on Kangana Ranaut | अभिनेत्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची कंगनाची खोड : राखी सावंत