Anasuya Sengupta Win Best Actress Award : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024' (Cannes Film Festival 2024) सध्या चांगलाच चर्चेत आहे. भारतातील अनेक अभिनेत्री यंदाच्या 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये भारताच्या अनसूया सेनगुप्ताने (Anasuya Sengupta) इतिहास रचला आहे. कोलकातात राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताला 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पुरस्कार पटकावणारी ही पहिली भारतीय ठरली आहे. अनसूया सेनगुप्ताला 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. अनसूया सेनगुप्ताच्या या यशानंतर चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. 


अनसूया सेनगुप्ताने कोणाला समर्पित केला आपला अवॉर्ड? 


अनसूया सेनगुप्ताने 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारताचं नाव काढलं आहे. अनसूया सेनगुप्ताने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. कान्समध्ये पुरस्कार पटकावणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. अनसूया सेनगुप्ताला तिच्या 'शेमलेस' या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. चित्रपटात अनसूया सेनगुप्ताने एक सेक्स वर्करची भूमिका साकारली आहे. अनसूया सेनगुप्ताचा 'शेमलेस' हा चित्रपट बुल्गारियाचे सिनेनिर्माते कॉन्स्टेंटिन बोजानो यांनी दिग्दर्शित केला आहे. अनसूया सेनगुप्ताने हा पुरस्कार जगभरातील LGBT समुदायाला समर्पित केला आहे. अनसूया सेनगुप्ताला सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी शुभेच्छा देत आहेत. 






अनसूयाने प्रोडक्शन डिझायनर म्हणून मिळवली लोकप्रियता


कोलकातामध्ये राहणाऱ्या अनसूया सेनगुप्ताने प्रोडक्शन डिझायनर म्हणून आपली लोकप्रियता मिळवली आहे. अनसूया सेनगुप्ताने 2009 मध्ये बंगाली चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर अनसूया मुंबईत शिफ्ट झाली. मुंबईत तिचा भाऊ अभिषेक सेनगुप्ता चित्रपटांमध्ये काम करायचा. अनसूया सेनगुप्ताला अभिनयासाठी जास्त विचारणा झाली नाही. आर्ट डिपार्टमेंटमध्ये ती जोडली गेली.


संबंधित बातम्या


Avneet Kaur : 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये अवनीत कौरचं एक हटके काम अन् लोक म्हणाले, 'ही आहे भारतीय संस्कृती'