हेमा मालिनी आणि अनुराग ठाकूर यांनी गेल्या आठवड्यात संसदेबाहेरच्या रस्त्याची झाडलोट केली होती. व्हिडिओ वायरल झाल्यावर नेटिझन्सनी दोघांना यथेच्छ ट्रोल केलं. हेमा मालिनी यांनी हातात धरलेला झाडू जमिनीला टेकतही नसल्याचं काही जणांनी म्हटलं. धर्मेंद्र यांनीही आपल्या पत्नीचा पाय खेचण्याची संधी सोडली नाही.
'सर, मॅडमनी प्रत्यक्षात कधी हातात झाडू घेतला आहे का?' असा प्रश्न एका ट्विटराईटने विचारला. 'हो चित्रपटामध्ये. मला पण ती अनाडी वाटली. मात्र मी आईची लहानपणी खूप मदत केली आहे. मैं झाडू मारण्यात पटाईत होतो. मला स्वच्छतेची आवड आहे' असं उत्तर धर्मेंद्र यांनी ट्विटरवर दिलं.
'महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त संसद परिसरात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. पुढच्या आठवड्यात मथुरा या माझ्या मतदारसंघात जाऊन मी पुन्हा हे अभियान राबवेन' असं हेमा मालिनी साफसफाईनंतर म्हणाल्या होत्या.