War Teaser : हृतिक आणि टायगरच्या अॅक्शनपॅक्ड 'वॉर'चा टीझर रिलीज
एबीपी माझा वेब टीम | 15 Jul 2019 02:50 PM (IST)
'वॉर'चा टीजर हिंदीसह तामिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही जारी केला आहे.
मुंबई : हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या आगामी 'वॉर' सिनेमाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. वॉरचा टीझर अॅक्शन आणि थ्रिलरने भरलेला आहे. वॉरच्या टीझरमध्ये हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या दमदार अॅक्शनसोबतच वाणी कपूरचा हॉट लूकही पाहायला मिळत आहे. 'वॉर'चा टीजर हिंदीसह तामिळ आणि तेलुगू भाषेतही प्रदर्शित करण्यात आला आहे. सोबतच चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टरही जारी केला आहे. हा चित्रपट सिद्धार्थ आनंदने दिग्दर्शित केला असून 2 ऑक्टोबर 2019 रोजी तो प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबाबत कोणतीही माहिती बाहेर येऊ नये अशी आदित्य चोप्राची इच्छा होती. त्यामुळेच आतापर्यंत या चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती किंवा सीन, किंवा फोटो समोर आला आहे. हृतिक रोशनचा हा चित्रपट 'सुपर 30'ही प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाला समीक्षक आणि प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवरही सिनेमाने चांगली कमाई केली आहे.