Pathaan Trailer OUT: 'बॉलिवूडचा बादशाह' अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण (Pathaan) या आगामी चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामधील झुमे जो पठाण (Jhoome Jo Pathaan) आणि बेशरम रंग (Besharam Rang) ही गाणी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाली. या गाण्यांनंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर (Pathaan Trailer) प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. ट्रेलरमधील डायलॉग्स आणि अॅक्शन सिन्सनं अनेकांचे लक्ष वेधले आहेत. या चित्रपटात शाहरुख खान दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि जॉन अब्राहम (John Abraham) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 


शाहरुख, दीपिका आणि जॉनचे चाहते पठाण चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकतेने वाट बघत होते.  यशराज फिल्म्सच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला सुपरस्टार हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या 'वॉर' चित्रपटाची आठवण होईल. 'वॉर' आणि 'पठाण' या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी केलं आहे. पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमधील शाहरुखच्या आणि जॉनचे डायलॉग्स प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत, तर दीपिकाचे ग्लॅमरस लूक्स देखील ट्रेलरमध्ये दिसत आहेत. 


पाहा ट्रेलर:



'एक सोल्जर ये नहीं पूछता देश ने उसके लिए क्या किया है। पूछता है वो देश के लिए क्या कर सकता है!' हा शाहरुखचा ट्रेलरमधील डायलॉग अनेकांचे लक्ष वेधत आहे.  पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. भारताव्यतिरिक्त स्पेन, यूएई, तुर्की, रशिया, सायबेरिया, इटली, फ्रान्स आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये या चित्रपटाचं चित्रीकरण झाले आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.  250 कोटींच्या बजेटमध्ये 'पठाण' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शाहरुखचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. 'पठाण' चित्रपट 2 जानेवारी रोजी सेन्सॉर झाला असून चित्रपटाचा एकूण कालावधी 146 मिनिटे म्हणजेच दोन तास 26 मिनिटे आहे.


पठाण व्यतिरिक्त शाहरुख हा  'डंकी' या आगामी चित्रपटामध्येही प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी हे करणार आहेत. तसेच त्याचा 'जवान' हा आगामी चित्रपट देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. शाहरुखच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने बघत आहेत. 


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Pathaan: पठाण चित्रपटामधील काही दृश्यांना कात्री; सेन्सॉरच्या सूचनेनंतर बदलले 'हे' शब्द