Amitabh Bachchan Sooryavansham Movie :  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची दुहेरी भूमिका असलेला 'सूर्यवंशम' ( Sooryavansham Movie) हा  1999 मध्ये रिलीज झाला होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सरासरी कमाई केली असली छोट्या पडद्यावर आजही हा चित्रपट पाहिला जातो. त्यामुळे आजही या चित्रपटाची क्रेझ कायम आहे.  या चित्रपटातील काही सीन्सवर मीम्सही बनतात. या चित्रपटातील ठाकूर भानूप्रताप यांना विष असलेली खीर देण्याचा सीन लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. भानूप्रताप यांच्यासाठी खीर देणारा लहान गोंडस मुलगाही सगळ्यांना आठवत असेल. पण, तो गोंडस मुलगा आता करतोय काय? सूर्यवंशम मधील हा गोंडस मुलगा आता 33 वर्षांचा झाला आहे. 


'सूर्यवंशम' या चित्रपटात ठाकूर भानू प्रताप सिंग यांच्या नातू आणि ठाकूर हीरा सिंग यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचे नाव  आनंद वर्धन असे आहे. आनंद हा फार कमी वयापासूनच अभिनयाच्या क्षेत्रात काम करत आहे. 






आनंद वर्धन याच्या आजोबांचे सिनेजगताशी संबंध होता. पी.बी. श्रीनिवास असे त्यांचे नाव  आह. ते एक गायक होते. त्यामुळे त्यांच्या घरात सिनेसृष्टीशी संबंधित मंडळींचे येणेजाणे होते. चिमुकल्या आनंदचे गोंडस रुप पाहून अनेकांनी त्याला चित्रपटात बालकलाकाराची भूमिका दिली. 






वयाच्या तिसऱ्या दिवशी आनंद वर्धनने चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. बाल कलाकार म्हणून आनंद वर्धनने 25 चित्रपटात काम केले. आनंद वर्धनला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून 'नंदी' अवॉर्डही मिळाला.  






बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत छाप सोडणाऱ्या आनंदने शिक्षणाच्या कारणाने रुपेरी पडद्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. आनंद वर्धनने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी टेक केले आहे. शिक्षण पू्र्ण केल्यानंतर आनंदने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी  नाते जोडण्यास सुरुवात केली. एका तेलगू चित्रपटात त्याने मु्ख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. सोशल मीडियावर आनंद चांगलाच सक्रिय असून आपले फोटोशूट शेअर करत असतो.