Kaun Banega Crorepati 13: कौन बनेगा करोपती- 13 चे सुत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करतात. गेली अनेक वर्ष अमिताभ या शोचे सुत्रसंचालन करत आहेत. अनेक वेळा आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील ते या शोमध्ये सांगतात. नुकत्याच या शोच्या एपिसोडमध्ये अमिताभ यांनी त्यांच्या बच्चन या आडनावची गोष्ट सांगितली आहे. 


'कौन बनेगा करोपती- 13' या शोच्या नुकत्याच झालेल्या भागामध्ये स्पर्धक भाग्यश्री तायडे यांच्यासोबत अमिताभ बच्चन बोलत होते. यावेळी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आडनावामागची गोष्ट सांगितली. भाग्यश्रीने अमिताभ यांनी सांगितले की, भाग्यश्री आणि त्यांच्या वडिलांचे संबंध त्यांनी प्रेमविवाह केल्याने खराब झाले होते. भाग्यश्रीने सांगितले की त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासोबतचे सर्व संबंध तोडले होते. कारण भाग्यश्री यांचा प्रेम विवाह त्यांना मान्य नव्हता. भाग्यश्रीची ही गोष्ट ऐकून अमिताभ बच्चन नाराज झाले. 


KBC 13 | जेव्हा हेमा मालिनी शोलेमधील धर्मेंद्र यांचा डायलॉग अमिताभ यांच्यासमोर बोलतात


अमिताभ बच्चन म्हणाले, 'मी या गोष्टीला समजू शकतो. कारण माझ्या आई-वडिलांनी देखील अंतरजातीय विवाह केला होता. माझी आई  (तेजी बच्चन)  सिख परिवारातील असून वडील (हरिवंश राय बच्चन) उत्तर प्रदेशातील कायस्थ कुटुंबातील होते. दोघांच्या आई- वडीलांनी या विवाहाला मान्यता दिली नव्हती. ही गोष्ट 1942 ची आहे. माझ्या वडिलांनी मुद्दाम माझे आडनाव बच्चनच ठेवल. त्यामुळे मी कोणत्या जातीचा आहे ते लोकांना लक्षात येत नाही. जेव्हा माझे शाळेत अॅडमिशन होणार होते तेव्हा माझे  आडनाव बच्चन सांगण्यात आले. बच्चन हे माझ्या वडिलांचे उपनाव होते. ते कवी होते.' एका मुलाखतीमध्ये अमिताभ यांनी सांगितले, 'मला अजूनही आठवते, शाळेत अॅडमिशन घेताना माझ्या वडिलांनी श्रीवास्तव  आडनावाऐवजी बच्चन  आडनाव लिहीले, मला या गोष्टीचा अभिमान आहे. '


Bigg Boss 15 : या आठवड्यात होणार बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एन्ट्री, कोण जाणार बिग बॉसच्या घरात याकडे चाहत्यांचे लक्ष


Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात रंगतोय 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' कॅप्टनसी टास्क, स्पर्धक आखत आहेत रणनीती