Bigg Boss Wild Card Entry Contentants Name : बिग बॉसच्या प्रत्येक एपिसोडवर चर्चा होत असते. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात काही सदस्यांची वाइल्ड कार्ड एन्ट्री होणार आहे अशा चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. शमिता शेट्टी, राकेश बापट, आरुषी दत्ता, अनुषा दांडेकर हे सदस्य बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार असे म्हटले जात आहे. अनुषा दांडेकर ही करण कुंद्राची एक्स गर्लफ्रेंड आहे. अजून बिग बॉसच्या मंचावरुन कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. 


'बिग बॉसच्या 15' व्या सीजनमधील वाइल्ड कार्ड स्पर्धक या आठवड्यातील एपिसोडचा हिस्सा असू शकतात. राकेश बापट आणि आरुषी दत्ताने घरात जाण्यासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. अनुषाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले आहे,"हे माझे आयुष्य आहे त्यामुळे मी कसं जगायचं हे मी ठरवणार. त्यामुळे माझ्याबद्दल पसरत असलेल्या अफवा कृपया थांबवा. मी या कार्यक्रमाचा भाग होणार नाही". 


अनुषाने पुढे लिहिले,"मी माझ्या आयुष्याची मालक आहे. त्यामुळे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मला कोणत्या घरात जाण्याची गरज नाही. तुम्ही सर्वांनी माझ्यावर प्रेम केले त्याबद्दल धन्यवाद. बिग बॉसचा 15 वा सीजन रोज नवीन वळणे घेत आहे".


'बिग बॉस मराठी'च्या घरात रंगतोय 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हा कॅप्टनसी टास्क


बिग बॉसच्या घरात सुरू आजी सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहे. त्यातच कालपासून घरामध्ये 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हा कॅप्टनसी टास्क रंगत आहे. या टास्कमध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणाऱ्या म्हातारी होत्या. तर दुसऱ्या टीममधील सदस्य त्यांना थांबवणारे प्राणी होते. प्राणी बनलेल्या सदस्यांना भोपळे घरातील गार्डन परिसरात लपवून ठेवायचे होते. तर म्हातारी बनलेल्या टीममधील सदस्यांना ते भोपळे शोधायचे होते. या प्रक्रियेत बाद न झालेला उमेदवार कॅप्टन पदाचा उमेदवार ठरणार आहे. टीम A मध्ये जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, संतोष आणि  विकास हे सदस्य आहेत. तर टीम B मध्ये विशाल, आदिश, सोनाली, मीरा, आविष्कार आणि मीनल हे सदस्य आहेत. कालच्या भागात B टीममधून मीरा कॅप्टन पदाची पहिली उमेदवार ठरी आहे. 


आजींनी टास्क सुरू होण्याआधीच सदस्यांना सांगितले होते, जो स्पर्धक जिंकेल त्याला खाऊ मिळेल तर जो हरेल त्याला शिक्षा मिळेल. त्यानुसार कॅप्टन पदाच्या उमेदवारीसाठी जिंकणाऱ्यांना आजी बेसनचे लाडू देणार आहे. हा टास्क चातुर्य आणि चपळाईने करायचा होता. पण ज्या सदस्यांना ते जमले नाही त्या उमेदवारांना चपळाई वाढावी म्हणून 25 उठाबशा काढायला आजींनी सांगितल्या.