Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा आज (11 ऑक्टोबर) 80 वा वाढदिवस आहे. बिग बींचा चाहता वर्ग मोठा आहे. चित्रपटांबरोबर वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अमिताभ बच्चन हे चर्चेत असतात. अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या रिलेशनशिपबाबत अनेक किस्से आजही चर्चेत आहेत. त्या दोघांच्या नात्याबाबत नेहमी चर्चा होत असते. असाच एक किस्सा 1977 मध्ये रिलीज झालेल्या  ‘गंगा की सौगंध’ या चित्रपटासोबत जोडलेला आहे. जाणून घेऊयात तो किस्सा...


गर्दीत घुसून बिग बींनी दिला होता चोप


गंगा की सौगंध या चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने अमिताभ बच्चन आणि रेखा जयपूरमध्ये होते. या चित्रपटाच्या काही भागाचे चित्रीकरण येथे होणार होते. असे म्हटले जाते की, चित्रपटाचे शूटिंग सुरू होताच गर्दीत उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने रेखा यांना टोमणे मारण्यास सुरुवात केली. त्या व्यक्तीला काही लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला पण तो व्यक्ती ऐकत नव्हता. असं म्हटलं जातं, रेखा यांनी शूटिंगला सुरुवात केली की तो व्यक्ती त्यांना टोमणे मारायला सुरुवात करत असेल. ते पाहून अमिताभ यांना राग आला. त्यानंतर अमिताभ यांनी गर्दीमध्ये जाऊन त्या व्यक्तीला चोप दिला होता. या घटनेनंतर रेखा आणि अमिताभ यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाली. 


'या' चित्रपटात दिली अमिताभ आणि रेखा यांची केमिस्ट्री


सिलसिला (1981), मिस्टर नटवरवाला (1979), सुहाग (1979), दो अंजाने (1976) या चित्रपटामध्ये रेखा आणि अमिताभ यांची केमिस्ट्री दिसली. रेखा आणि अमिताभ यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची आजही पसंती मिळते. 


अमिताभ बच्चन यांचा 80 वा वाढदिवस 


अमिताभ बच्चन यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यांचे चाहते तसेच अनेक सेलिब्रिटी अमिताभ यांना सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अमिताभ बच्चन मध्यरात्रीनंतर त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानातून बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातमी: