Amitabh Bachchan Birthday: बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचा आज 80वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने त्यांचे चाहते देखील जल्लोष करताना दिसले आहेत. ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवस (Amitabh Bachchan Birthday) निमित्ताने मध्यरात्री बाराच्या सुमारास अमिताभ बच्चन यांच्या जुहू इथल्या ‘जलसा’ निवासस्थाना बाहेर मोठ्या संख्येमध्ये चाहत्यांची गर्दी जमली होती. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांकडून केक कटिंग करून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
या खास प्रसंगी आपल्या चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी बिग बी अमिताभ बच्चन स्वतः जलसा बंगल्याबाहेर आले होते. बाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारून पुन्हा घरात गेले. यावेळी त्यांनी चाहत्यांनी आणलेला केक देखील कापला. स्वतः अमिताभ बच्चन यांनी आपल्या फॅन्सकडून शुभेच्छांचा स्वीकार केल्यामुळे, त्यांच्या फॅन्समध्ये चांगला उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला होता.
पाहा व्हिडीओ :
अमिताभ बच्चन मध्यरात्रीनंतर त्यांच्या ‘जलसा’ निवासस्थानातून बाहेर आले होते. या ठिकाणी मोठ्या संख्येने चाहते जमले होते. अमिताभ बच्चनयांनी हात हलवून सर्वांचे स्वागत केले, चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या आणि काही वेळाने पुन्हा घरात गेले. यावेळी त्यांचे चाहते खूप आनंदी आणि उत्साही दिसत होते. मध्यरात्री आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आणि त्यांना प्रत्यक्ष समोर पाहताना चाहते चांगलेच आनंदात आणि उत्साहात दिसत होते.
आजचा ‘केबीसी’चा खेळ असणार खास!
पत्नी जया बच्चन आणि मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यासह बिग बी आज केबीसीच्या स्टेजवर पोहोचून चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहेत. या शोमध्ये अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील काही खास क्षणांची आठवण सांगताना दिसणार आहेत. अमिताभ बच्चन बर्थडेच्या स्पेशल एपिसोडमध्ये अभिषेक बच्चन आणि जया बच्चन केबीसीच्या स्टेजवर हजेरी लावणार आहेत. अमिताभ बच्चन हे आतापर्यंत स्पर्धकांना प्रश्न विचारताना दिसले आहेत, पण आता शोच्या आगामी भागात अमिताभ बच्चन त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनसोबत हॉट सीटवर बसलेले दिसणार आहेत आणि त्यांच्या पत्नी जया बच्चन प्रश्न विचारणार आहेत.
80व्या वर्षी ही बिग बी तंदुरुस्त!
अभिनेते अमिताभ बच्चन आज 80 वर्षांचे झाले आहेत. परंतु, या वयातही ते खूपच फिट आहेत. त्याचा फिटनेस पाहून सगळेच थक्क झाले आहेत. सोशल मीडियापासून ते टीव्हीपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर ते सक्रिय आहेत. त्यांची फॅन फॉलोइंग कोणत्याही तरुण अभिनेत्यापेक्षा कमी नाही. आपला फिटनेस सांभाळण्यासाठी बिग बी अनेक कडक नियम पाळतात. आहारासोबातच ते व्यायामावर लक्ष केंद्रित करतात.
हेही वाचा :