Amitabh Bachchan Viral Post : बॉलिवूडचे 'बिग बी' अमिताभ बच्चन सोशल मीडियावर चांगलेच सक्रीय असतात. महानायक अमिताभ चाहत्यांसोबत जोडलेलं राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. ते दररोज सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांच्या भावना चाहत्यांसमोर व्यक्त करतात, यासोबतच ते चाहत्यांना त्यांच्या आयुष्यातील अपडेट्सही सांगतात. यामुळे ते कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असतात. आता अमिताभ बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या क्रिप्टिक पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या ही पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली असून अमिताभ बच्चन इंडस्ट्रीला राम-राम करणार का, असा प्रश्नही चाहत्यांना पडला आहे.
अमिताभ बच्चन यांचा इंडस्ट्रीला राम-राम?
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची एक्स मीडिया अकाऊंटवरील नवीन पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. शनिवारी मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. 7 फेब्रुवारी रोजी अमिताभ यांनी पोस्ट करत लिहिलं होतं की, "जाण्याची वेळ आली आहे". बिग बींची ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. त्यांची तब्येत ठिक आहे की, नाही याबद्दलही अनेकांनी विचारलं. त्यानंतर त्यांनी 8 फेब्रुवारीला नवीन पोस्ट करत पुन्हा एकदा चाह्त्यांना संभ्रमात टाकलं.
बिग बींच्या नव्या पोस्टमुळे चाहते चिंतेत
अमिताभ बच्चन यांनी आधी पोस्ट केली की, "जाण्याची वेळ आली आहे". त्यानंतर त्यांनी दुसरी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, "जाण्याची इच्छा नाही... पण जावं लागलं!" अमिताभ बच्चन यांच्या एकामागोमाग एक क्रिप्टिक पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. 82 व्या वर्षी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन फिल्म इंडस्ट्रीला राम-राम करणार का? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. बिग बींच्या पोस्टमध्ये चाहते गोंधळात पडले आहेत. काही नेटकऱ्यांनी त्यांना सर्व काही ठीक आहे ना? असंही विचारलं आहे.
चाहत्यांकडून तब्येतीचीही विचारपूस, व्यक्त केली चिंता
दरम्यान, अनेक युजर्संनी अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टची खिल्लीही उडवली. एकाने लिहिलं, 'सर, आता बस्स झालं... कालपासून तुम्ही मला घाबरवत आहात.' दुसऱ्या एका युजरने लिहिलंय, 'साहेब, झोपा, खूप उशीर झाला आहे. अशा गोष्टी पोस्ट करू नका.'आणखी एकाने प्रश्नि विचारलाय की, 'तुमचं जयाजींशी भांडण झालं आहे का?' आणखी एकाने लिहिलंय, 'साहेब, असे ट्विट करून तुम्ही आम्हाला रडवणार आहात का?'
महत्त्वाच्या इतर बातम्या :