मुंबई : बॉलिवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन यांनी चित्रपट, जाहिराती आणि केबीसी सारख्या शोमधून अब्जावधी रुपये कमावले असतील. मात्र बिग बींनी चक्क आपल्या सूनबाई ऐश्वर्या रायकडून 21.4 कोटी रुपयांची रक्कम कर्जाऊ घेतल्याची माहिती आहे.
दैनिक भास्कर, एशियानेट न्यूज यासारख्या वेबसाईटच्या दाव्यानुसार अमिताभ यांनी वैयक्तिक कारणासाठी ऐश्वर्याकडून कर्ज घेतलं आहे. 2014 मध्ये बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यामध्ये ही कौटुंबिक माहिती उघड करण्यात आली आहे.
अमिताभ बच्चन यांनी अभिषेककडून 50 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आहे, तर जया यांनी 1.6 कोटी रुपये लेकाकडून घेतले आहेत. गल्ट.कॉम नावाच्या वेबसाईटनुसार बिग बींच्या डोक्यावर एकूण 104 कोटी रुपयांचं कर्ज आहे. त्यापैकी 21.4 कोटी रुपये ऐश्वर्याकडून उसने घेण्यात आले आहेत. जया यांच्या डोक्यावर 48 कोटींचं कर्ज आहे.
बिग बींच्या डोक्यावर ऐश्वर्या रायचं 21 कोटींचं कर्ज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Nov 2017 11:00 PM (IST)
2014 मध्ये बिग बी यांच्या पत्नी, अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यामध्ये ही कौटुंबिक माहिती उघड करण्यात आली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -