Budget 2022 : काल (1 फेब्रुवारी) केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी युवक महिला आणि शेतकरी या सर्वांबाबतीत अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. क्रिप्टोकरेन्सीवरील (Crypto) कर तसेच वेगवेगळ्या घोषणांवर आता सोशल मीडियावर मीम्स तयार केले जात आहेत. हे मीम्स सध्या व्हायरल होत आहेत.
सध्या अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' या चित्रपटाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. 'मै झुकेगा नही' या डायलॉगचे 'मै बचेगा ही नही' असं मीम एका नेटकऱ्यानं केले आहे. हे बजेटवरील भन्नाट मीम सध्या व्हायरल होत आहे.
अनुष्का शर्माचा सुई धागा या चित्रपटातील फोटो शेअर करून त्यावरही मीम एका यूझरनं तयार केलं आहे. या फोटोवर लिहिलेले दिसत आहे की, क्रिप्टो धारक 30 टक्के
कराची घोषणा झाल्यानंतर-
बिग बॉस शोमुळे विशेष लोकप्रियता मिळवणारी शहनाजचा 'क्या करू मै मर जाऊ' हा डायलॉग फेमस झाला. बजेटची घोषणा झाल्यानंतर या डायलॉगवर देखील मीम तयार करण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या
Cryptocurrency: क्रिप्टोकरन्सीवर 30 टक्के कर, हे तर क्रिप्टोला मान्यता देण्याकडे एक पाऊल
Budget 2022 Housing: घरांसाठी 48 हजार कोटींचे पॅकेज, 2023 पर्यंत 80 लाख नवी घरं बांधणार
Gehraiyaan : 'गेहरांईया'चं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला, 11 फेब्रुवारीला सिनेमा होणार रिलीज
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha